अभिनेता अभिषेक बच्चन अलीकडेच ‘कौन बनेगा करोडपती’च्या एका भागात सहभागी झाला होता. या भागात त्याने अमिताभ बच्चन यांचे अनेक किस्से सांगितले. याच भागात अभिषेकने तो त्याच्या वडिलांपेक्षा चांगला ड्रायव्हर असल्याचा दावा केला आहे. याचसंबंधीचा एक किस्सा सांगताना अभिषेक बच्चनने अमिताभ बच्चन यांची एक विचित्र सवय सांगितली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘कौन बनेगा करोडपती’मध्ये अभिषेक बच्चनसह दिग्दर्शक शूजित सरकारसुद्धा सहभागी झाला होता. त्यानेच अभिषेक बच्चन आणि अमिताभ बच्चन यांना तुमच्या दोघांपैकी चांगला ड्रायव्हर कोण आहे हा प्रश्न विचारला. शूजित सरकारच्या प्रश्नावर उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी आपला हात वर करत ते अभिषेकपेक्षा चांगले ड्रायव्हर आहेत असे सांगितले. पण, अभिषेकने पटकन म्हटलं, “पॉ, प्लीज!” आणि त्यानंतर अमिताभ यांनी लाजत आपला हात खाली घेतला.

हेही वाचा…शाहरुख खान दोन्ही मुलांसह नव्या चित्रपटासाठी येणार एकत्र, ट्रेलर आला समोर; म्हणाला, “आर्यन आणि अबरामबरोबर…”

यानंतर अभिषेकने हसत म्हटले, “तुम्ही मला गाडी चालवायला शिकवलंय, पण आता मी तुमच्यापेक्षा खूप चांगला ड्रायव्हर आहे.” हे ऐकताच प्रेक्षकांमध्ये हास्यकल्लोळ झाला. यावेळी अभिषेकने अमिताभ यांच्याविषयी एक मजेशीर किस्सा सांगितला की, ड्रायव्हिंगच्या वेळी अमिताभ बच्चन यांना स्वतः गाडी चालवण्यापेक्षा इतर ड्रायव्हरला टोमणे मारण्यात जास्त मजा येते असे अभिषेक म्हणाला.

गाडी चालवताना अमिताभ बच्चन करतात ‘ही’ कृती

अभिषेक म्हणाला, “जर एखादी व्यक्ती चुकीच्या बाजूने येत असेल तर ते लगेच फोन काढून त्याचा फोटो काढायला लागतात. मी त्यांना विचारलं की, तुम्ही हे का करत आहात? तेव्हा ते म्हणाले, ‘मी हा फोटो ट्रॅफिक पोलिसांना पाठवणार आहे.’ आणि दुसऱ्या ड्रायव्हरला वाटतं, ‘वा! अमिताभ बच्चन माझा सेल्फी घेत आहेत!'” या किश्श्यावर प्रेक्षक, अमिताभ बच्चन आणि शूजित सरकार खळखळून हसताना दिसतात.

हेही वाचा…अभिनेत्री कश्मीरा शाहने अपघातानंतर स्वतःचा पहिला फोटो केला पोस्ट; म्हणाली, “माझा चेहरा…”

सध्या अभिषेक आणि शूजित हे त्यांच्या आगामी चित्रपट ‘आय वाँट टू टॉक’ च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. हा चित्रपट २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा अभिषेकचा शूजित सरकार बरोबरचा पहिला चित्रपट आहे. शूजितने यापूर्वी ‘पीकू’ आणि ‘गुलाबो सिताबो’ यांसारखे हिट चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. शूजितने याआधी ‘पीकू’ या सिनेमात अमिताभ बच्चन यांच्याबरोबर काम केले आहे. शूजितचा ‘पीकू’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला होता. ‘पीकू’ने अमिताभ बच्चन यांना त्यांच्या करिअरमध्ये चौथा राष्ट्रीय पुरस्कार जिंकून दिला.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Abhishek bachchan reveals amitabh bachchan driving habit on kaun banega crorepati psg