Bigg Boss 19 Fame Abhishek Bajaj’s Ex Wife Shared Cryptic Post : अभिषेक बजाज हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेता आहे. सध्या अभिषेक ‘बिग बॉस १९’मुळे चर्चेत आहे. त्याव्यतिरिक्त अभिषेक सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळेही चर्चेत आहे. अशातच आता त्याच्या एक्स पत्नीने सोशल मीडियावर खोचक पोस्ट शेअर केली आहे.

अभिषेक बजाज व अशनूर कौर ‘बिग बॉस’च्या घरातील लोकप्रिय स्पर्धकांपैकी एक आहेत. दोघे अनेकदा एकत्र गप्पा मारताना दिसतात. त्यामुळे हे दोघे एकमेकांना पसंत करतात, असंही अनेकदा घरातील इतर स्पर्धक म्हणताना दिसतात. अभिषेकचा आकांक्षा जिंदलबरोबर २०२३ मध्ये घटस्फोट झाला आहे. तर, २१ वर्षांची अशनूर या पर्वातील सगळ्यात लहान स्पर्धक आहे. एकीकडे ‘बिग बॉस’च्या घरात अशनूरबरोबर अभिषेकची मैत्री बहरत असताना दुसरीकडे आता त्याच्या एक्स पत्नीने पोस्ट शेअर केली आहे. तिने पूर्वीसुद्धा अभिषेकबरोबरच्या लग्नाबद्दल प्रतिक्रिया दिली होती.

बिग बॉसच्या घरात अभिषेकच्या एक्स पत्नीची होणार एन्ट्री?

सलमान खानने अशातच आता नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’मध्ये अभिषेकला त्याची एक्स पत्नी आकांक्षाची कदाचित ‘बिग बॉस’च्या घरात वाईल्ड कार्ड स्पर्धक म्हणून एन्ट्री होऊ शकते, अशी हिंट दिली आहे. त्याने सगळ्यांसमोर अभिषेकला त्याची एक्स पत्नी त्याच्याबद्दल कदाचित बाहेर काही प्रतिक्रिया देत असेल, असं म्हटलं.

अभिषेकच्या एक्स पत्नीची प्रतिक्रिया

अभिषेकच्या एक्स पत्नीने रविवारी इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करीत त्यांच्या घटस्फोटाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. ‘फ्री प्रेस जर्नल’च्या वृत्तानुसार लोकांनी इतक्या वर्षांनंतर आता ती अभिषेकबद्दल प्रतिक्रिया का देत आहे, असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर आकांक्षानं तिची प्रतिक्रिया देत म्हटलं, “जे म्हणतायत की, मी सहा वर्षांनंतर प्रतिक्रिया देत आहे. त्यांच्या माहितीसाठी सांगते की, कृपया तुमच्याकडे असलेली माहिती तपासा. आम्ही १८ ऑगस्ट २०२३ मध्ये विभक्त झालो. तुम्ही सत्य काय आहे विचारलं आणि मी ते सांगितलं आणि आता अचानक मी अडचण ठरत आहे? जर फक्त तुम्हालाच सत्य परिस्थिती माहीत असती, तर तुम्ही अशी प्रतिक्रिया दिली नसती. सत्य बोलल्यामुळे निरागस लोकांना काही समस्या होत नाही, तर जे चुकीचे असतात त्यांनाच भीती वाटते.”

आकांक्षा जिंदल इन्स्टाग्राम स्टोरी

नुकत्याच पार पडलेल्या ‘वीकेंड का वार’ला सलमान खान मालती चहरवर बाहेरच्या गोष्टींबद्दल घरात चर्चा केल्यामुळे रागावला आणि कदाचित अजून एक वाईल्ड कार्ड स्पर्धक घरात येऊ शकतो याची शक्यता वर्तवली. घरात येणारा स्पर्धक स्त्री किंवा पुरुष कोणीही असू शकतो आणि त्यांच्यामुळे अजून ड्राम होऊ शकतो, असंही त्यांना यावेळी म्हटलं आहे. पुढे सलमान खान, “पत्नी आणि एक्स पत्नी कोणीही असू शकतं जेव्हा तुम्ही लोकप्रियता मिळवता आणि ते तितके लोकप्रिय नसतील, तर तेव्हा प्रसिद्धीसाठी एक तर ते तुमचं कौतुक करतील किंवा काही गुपितं सांगून तुमच्यावर टीका करतील, जे आता होत आहे”, असं म्हणाला. यावेळी त्यानं अभिषेकला, “बरोबर ना अभिषेक; प्रत्येकाचा चांगला-वाईट भूतकाळ समोर येतोच. त्यामुळे तुम्ही सगळे फक्त हे लक्षात ठेवा- जसं तुम्हाला तान्याबद्दलची माहिती जाणून घेण्यात रस आहे, तसंच इतरांनाही तुमच्याबद्दल जाणून घेण्यात रस असतो,” असं म्हटलं आहे.

अभिषेक पुढे त्याच्या एक्स पत्नीबरोबर अशनूर कौरबरोबर चर्चा करताना दिसला. अभिषेक अशनूरला म्हणाला, “ती इकडे तर येणार नाही ना?” त्यावर अशनूर म्हणाली, “नाही” आणि त्यानंतर तिनं “ती अभिनेत्री आहे का”, असं विचारलं. अभिषेक त्यावर उत्तर देणार तितक्यात त्याला त्याचा माईक ठीक करायला सांगितलं गेलं.