बिग बॉस १७ च्या पर्वातून नुकताच विकी जैन बाहेर पडला. फिनालेआधीच विकी बिग बॉसच्या घरातून बाहेर पडला आणि त्याची पत्नी अंकिता लोखंडे टॉप ५ मध्ये गेली. जेव्हा विकी स्पर्धेबाहेर गेला, तेव्हा अंकिता खूप रडली. बाहेर पडल्यावर विकीने पार्टी करू नये असं अंकिताचं मत होतं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पण, विकीने घराबाहेर आल्यानंतर लगेच त्याच्या घरी एक पार्टी आयोजित केली होती, ज्यात बिग बॉस १७ तील माजी स्पर्धक सामील होते. आता याविषयी अंकिता लोखंडे म्हणतेय की, ती घरी जाऊन सीसीटीव्ही फुटेज तपासून पाहणार आहे की घरी कोण कोण आलं होतं.

हेही वाचा… मराठमोळ्या अभिनेत्रीचं दाक्षिणात्य सिनेसृष्टीत पदार्पण, अनुभव सांगत म्हणाली, “मराठी व मल्याळम चित्रपटांमध्ये भरपूर…”

नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये अंकिता सकाळी उठल्या उठल्या आपल्या पती विकीचं नाव घेत त्याला गुड मॉर्निंग बोलताना दिसली. यावरून अभिषेक अंकिताला म्हणाला की, विकी तर त्याची पार्टी संपवून आता झोपायला जात असेल. यावर उत्तर देत अंकिता म्हणाली की, मलापण असंच वाटतंय की त्याने रात्रभर पार्टी केली असेल. माझ्या परवानगीशिवाय घरी कोणीच येऊ शकत नाही. या पाच दिवसांत घरी कोण कोण आलं याचं रेकॉर्डिंग मी घरी जाऊन पाहणार आहे.

हेही वाचा… हृतिक रोशनच्या ‘फायटर’ चित्रपटाच्या ट्रेलरची शाहरुख खानला भुरळ; म्हणाला, “खलनायकाचा लूक अन्…”

अंकिताचं बोलण ऐकून मनारा तिला म्हणाली की, खरंच ती घरी जाऊन सगळं सीसीटीव्ही फुटेज चेक करणार आहे का?

यावर अंकिता म्हणाली, “जर असं काही घडणार असेल किंवा जर मला शंका आली, तर हो.. नक्कीच चेक करेन.”

बिग बॉस १७ च्या पर्वातून बाहेर येताच विकीने त्याच्या घरी एक ग्रॅंड पार्टी आयोजित केली होती. ज्यात त्याचे मित्र आणि माजी स्पर्धक ईशा मालवीय, सना खान, आयशा खान यांचाही सहभाग होता. या पार्टीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताना दिसत आहेत. अंकिता आणि विकीच्या मुंबईच्या घरातील हे फोटोज आहेत.

Image- purva_rana /instagram

विकी भैया बॅक इन टाउन असे कॅप्शन देत पूर्वा राणा हिने तिच्या इन्स्टाग्रामवर पार्टीचे फोटो शेअर केले आहेत. सना आणि विकी यांची मैत्री बिग बॉसच्या घरी खूप चर्चेत होती. आता पार्टीतील या फोटोंनी नेटकऱ्यांचंही लक्ष वेधून घेतलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: After bigg boss 17 eviction vicky jain parties with ex contestants ankita lokhande will check footage dvr