मराठी मालिका, चित्रपट व रंगभूमी गाजवणारी प्रेक्षकांची लाडकी जोडी म्हणून ऐश्वर्या व अविनाश नारकर यांना ओळखलं जातं. या दोघांचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे. दोघांचाही फिटनेस आजच्या तरुणपिढीला लाजवेल असाच आहे. अभिनयाबरोबरच ऐश्वर्या-अविनाश त्यांच्या इन्स्टाग्राम रिल्समुळे चर्चेत असतात. सध्या मालिकेच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून हे जोडपं पाझगणी फिरायला गेलं आहे. याठिकाणी ऐश्वर्या-अविनाश यांनी एकापेक्षा एक जबरदस्त रील्स व्हिडीओ बनवले आहेत. या सगळ्याच व्हिडीओंची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून ऐश्वर्या नारकर त्यांच्या सोशल मीडियावर अकाऊंटवर ट्रेडिंग गाण्यांवर डान्स करतानाचे सुंदर व्हिडीओ शेअर करत आहेत. या व्हिडीओवर नेटकरी सुद्धा कौतुकाचा वर्षाव करत आहेत. नारकर जोडप्याने नुकत्याच शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये बॉलीवूड आणि दाक्षिणात्य गाण्यांना थोडसं बाजूला सारत चक्क कोळी गीतावर डान्स केला आहे. हे गाणं कोणतं आहे जाणून घेऊयात…

हेही वाचा : ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिकेसाठी अक्षराची पोस्ट, निमित्त आहे खूपच खास; शिवानी रांगोळे म्हणते…

ऐश्वर्या व अविनाश नारकर डान्स करत असलेल्या कोळी गाण्याचे “आगरान गेलू मी डोंगरानं गेलू गो…पायान काटा…पायान काटा…माजे भरलान गो!” असे बोल आहेत. याशिवाय हे गाणं लोककवी हरेंद्र जाधव यांनी लिहिलं आहे. तेच या गाण्याचे गीतकार आहेत. सध्या हे गाणं सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. त्यामुळे मराठी कलाविश्वातील ही लोकप्रिय जोडी या गाण्यावर थिरकली आहे.

हेही वाचा : Video : ‘रंग माझा वेगळा’ फेम अनघा अतुलचा कुटुंबीयांसह ‘झिंगाट’ गाण्यावर डान्स, अभिनेत्रीचा भाऊ अडकणार लग्नबंधनात

नारकर जोडप्याच्या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी कौतुकाचा वर्षाव केला आहे. “तरुणांना लाजवेल अशी ऊर्जा तुम्हा दोघांमध्ये आहे”, “अविनाश तुमचे हावभाव कमाल आहेत”, “खूप छान…अविनाश सर खूप छान”, “सुंदर कोळीगीत” अशा कमेंट्स युजर्सनी या व्हिडीओवर केल्या आहेत. अवघ्या दोन दिवसांत नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

हेही वाचा : प्रसिद्ध अभिनेत्रीने हटवले लग्न अन् गुढीपाडव्याचे फोटो, तीन महिन्यांतच घेणार मराठमोळ्या पतीपासून घटस्फोट?

हेही वाचा : Video: ठरलं! ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेत प्रमुख भूमिकेत झळकणार समीर परांजपे, ‘थोडं तुझं आणि थोडं माझं’चा जबरदस्त प्रोमो प्रदर्शित

दरम्यान, या दोघांच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर अभिनेत्री ऐश्वर्या नारकर सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत रुपाली हे नकारात्मक पात्र साकारत आहेत. याशिवाय अविनाश नारकरांच्या ‘कन्यादान’ मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. आता भविष्यात त्यांना विविधांगी भूमिकांमध्ये पाहण्यासाठी त्यांचे चाहते उत्सुक आहेत.