छोट्या पडद्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात असतो. ‘रंग माझा वेगळा’ ही स्टार प्रवाहवरील मालिका घराघरांत लोकप्रिय होती. गेल्यावर्षी या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये रेश्मा शिंदे, हर्षदा खानविलकर, आशुतोष गोखले, अनघा अतुल यांच्या प्रमुख भूमिका होत्या. अभिनेत्री अनघा अतुल या मालिकेमुळे घराघरांत लोकप्रिय झाली. यामध्ये तिने श्वेता हे नकारात्मक पात्र साकारलं होतं. सध्या अभिनेत्री तिच्या भावाच्या लग्नामुळे चर्चेत आली आहे.

अनघाच्या घरी सध्या तिच्या भावाची म्हणजेच अखिलेशची लगीनघाई चालू आहे. फेब्रुवारी महिन्यात अखिलेशच्या लग्नाची सुपारी फुटली होती. या फोटोला अनघाने “अखिलेश आणि वैष्णवी तुम्हाला खूप प्रेम” असं कॅप्शन दिलं होतं. आता लवकरच अनघाच्या भावाचा विवाहसोहळा पार पडणार आहे. याची खास झलक अभिनेत्रीने इनस्टाग्राम स्टोरीवर शेअर केली.

arjun and savi dances on pushpa 2 soosaki song
श्रीवल्लीच्या ‘अंगारों’ गाण्यात मराठमोळा ठसका! अर्जुन-सावीने केला जबरदस्त डान्स, अवघ्या काही तासांत मिळाले लाखो व्ह्यूज
aashay kulkarni exit from muramba serial
काजल काटे, स्मिता शेवाळेनंतर आणखी एका अभिनेत्याची ‘मुरांबा’ मालिकेतून एक्झिट; म्हणाला, “प्रेक्षकहो…”
Tharla tar mag fame jui gadkari get ready like this for sayali character
‘ठरलं तर मग’ या मालिकेतील सायलीच्या भूमिकेसाठी जुई गडकरीला ‘असा’ करावा लागतो नट्टापट्टा, अभिनेत्रीने केला व्हिडीओ शेअर
Balika Vadhu fame Anandi eka Avika Gor shared Shocking incident on bad touch of bodyguard
“त्याने चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला अन्…, ‘बालिका वधू’ फेम आनंदीने सांगितला ‘तो’ धक्कादायक प्रसंग, म्हणाली…
rang maza vegla fame manasi ghate will play important role in thoda tuza ani thoda maza
शिवानी सुर्वेच्या नव्या मालिकेत झळकणार ‘रंग माझा वेगळा’ फेम अभिनेत्री! साकारणार ‘ही’ भूमिका
Tharla tar mag fame amit bhanushali son gave him a surprise on fathers day
‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीच्या लेकाने ‘असं’ दिलं बाबाला सरप्राईज, अभिनेता फोटो शेअर करत म्हणाला…
shivani rangole father wanted to give her name anuprita
शिवानी नव्हे तर…; अभिनेत्रीच्या वडिलांनी लेकीचं ठेवलेलं ‘हे’ नाव, मास्तरीण बाईंनी पहिल्यांदाच केला खुलासा
shivani surve thoda tuza ani thoda maza serial will start from today
१२ वर्षांपूर्वी ‘देवयानी’ अन् आता ‘मानसी’, नवीन मालिका सुरू होण्यापूर्वी शिवानी सुर्वेची खास पोस्ट, प्रेक्षकांना म्हणाली…
Tujhech Mi Geet Gaat Aahe Fame avanee joshi shared Thanks post for audience
Video: मैनू विदा करो…; ‘तुझेच मी गीत गात आहे’मधील पिहूने अरिजित सिंहचं गाणं गात प्रेक्षकांचे मानले आभार, जुन्या आठवणींना दिला उजाळा

हेही वाचा : Video: भगरे गुरुजींचा मुलगा लवकरच चढणार बोहल्यावर, लग्नाआधीच्या कार्यक्रमांना पारंपरिक पद्धतीत झाली सुरुवात, पाहा व्हिडीओ

मुहूर्त समारंभ व लग्नाआधीचे विधी पार पडल्यावर अभिनेत्री व तिचा भाऊ अखिलेश कुटुंबीयांबरोबर एकत्र थिरकताना पाहायला मिळाले. अनघाने तिच्या भावाबरोबर ‘झिंगाट’ गाण्यावर जबरदस्त डान्स केला. याचा खास व्हिडीओ अभिनेत्रीने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. भावाच्या लग्नाच्या तारखेबद्दल अभिनेत्रीने अद्याप खुलासा केलेला नाही. परंतु, हळद कुटण्याच्या कार्यक्रमावरून अखिलेश लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याचा अंदाज आहे.

हेही वाचा : जान्हवी कपूर दरवर्षी तिरुपती मंदिरात का जाते? पहिल्यांदाच केला खुलासा; म्हणाली, “आईच्या निधनानंतर…”

अनघाचा भाऊ अन् कुटुंबीयांबरोबर झिंगाट गाण्यावर डान्स

हेही वाचा : अनंत-राधिकाच्या दुसऱ्या प्री-वेडिंगची पत्रिका चर्चेत, चार दिवस विदेशात क्रूझवर होणार धमाल; अंबानी-मर्चंट कुटुंबातील सदस्य झाले रवाना

हेही वाचा : “लाथ मारली, धमक्या दिल्या”, रेल्वे प्रवास करताना अश्विनी कासारला आला ‘असा’ अनुभव, पोलिसांना टॅग करत म्हणाली…

अनघा व अखिलेश ही पंडित अतुलशास्त्री भगरे यांची मुलं आहेत. दरम्यान, या दोन्ही भावंडांनी मिळून गेल्यावर्षी पुण्यात ‘वदनी कवळ’ नावाचं नवीन हॉटेल चालू केलं आहे. या हॉटेलवर आतापर्यंत असंख्य मराठी कलाकारांनी भेट दिली आहे. याशिवाय अभिनेत्रीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेनंतर अनघा ‘पिरतीचा वणवा उरी पेटला’ या कलर्स मराठीवरील मालिकेत झळकली होती. यामध्ये अनघाने मनालीची भूमिका साकारली होती. सध्या भावाच्या लग्नामुळे भगरे कुटुंबीयांकडे उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.