Friendship Day 2024 : आज फ्रेंडशिप डेनिमित्ताने कलाकार मंडळी आपल्या जीवलग मित्र-मैत्रिणींसाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत आहेत. फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांना फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा देत आहेत. तसंच खास मित्र-मैत्रिणींबरोबरचे किस्से देखील लिहित अन् सांगत आहेत. अशातच अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) व अभिनेते अविनाश नारकरांनी ( Avinash Narkar ) आपल्या अनोख्या अंदाजात फ्रेंडशिप डेच्या चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्री ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) व अभिनेते अविनाश नारकर हे सोशल मीडियावरील चर्चित कपल आहे. त्यांच्या कामावर चाहते जितकं प्रेम करतात तितकंच त्यांच्या सोशल मीडियावरील व्हिडीओवर प्रेम करत असतात. त्यामुळे ऐश्वर्या व अविनाश नारकरांचे व्हिडीओ सातत्याने व्हायरल होतं असतात. अनेकांना ते खटकतात पण दोघं त्याकडे दुर्लक्ष करून नेहमी ट्रेंडिंग गाण्यावर डान्स व्हिडीओ करत असतात. हेही वाचा - Video: धनंजय पोवारचा इरिनाबरोबर ‘भूतानी पछाडलं’ गाण्यावर जबरदस्त परफॉर्मन्स, नेटकरी म्हणाले, “कल्याणी वहिनी दादाकडे लक्ष द्या…” नुकतंच दोघांनी फ्रेंडशिप डेनिमित्ताने चाहत्यांना शुभेच्छा देण्याकरिता एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ऐश्वर्या व अविनाश नारकर मधुबाला यांच्या 'एक परदेसी मेरा दिल ले गया' गाण्यावर डान्स करताना पाहायला मिळत आहेत. यावेळी दोघांच्या हावभावाने सगळ्यांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ शेअर करत ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) यांनी लिहिलं आहे, "फ्रेंडशिप डेच्या शुभेच्छा. नेहमी एकमेकांच्या सोबत राहा. जीवनाचा आनंद लुटा." ऐश्वर्या व अविनाश यांचा व्हिडीओ पाहून अभिजीत केळकर म्हणाला. ऐश्वर्या व अविनाश नारकरांच्या व्हिडीओवर त्यांच्या चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. तसंच 'बिग बॉस मराठी'मध्ये झळकलेला अभिनेता अभिजीत केळकरने देखील प्रतिक्रिया दिली आहे. अभिजीतला ऐश्वर्या व अविनाश नारकरांचा हा व्हिडीओ आवडला असून त्याने लिहिलं आहे, "तुम्ही अशा जुन्या गाण्यांवर खूप रील्स करा. बघायला खूप आवडतील." Abhijeet Kelkar Comment हेही वाचा – Video: ‘ठरलं तर मग’ फेम अमित भानुशालीचा चांगला मित्र आहे ‘हा’ अभिनेता, शूटिंगचा किस्सा सांगत म्हणाला… दरम्यान, ऐश्वर्या व अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) सध्या ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळत आहेत. या मालिकेमध्ये त्यांनी अद्वैत म्हणजेच अजिंक्य ननावरेच्या आईची भूमिका साकारली आहे. ऐश्वर्या नारकरांची ही भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे. तसंच अविनाश यांचा ‘डंका हरी नामाचा’ नवा चित्रपट १९ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. या चित्रपटात अविनाश नारकरांसह अभिनेता अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, रसिका सुनिल, अक्षया गुरव झळकले आहेत. या चित्रपटातील गाणी सध्या चांगली चर्चेत आहेत.