Aishwarya Narkar Video Post : ऐश्वर्या नारकर, तितीक्षा तावडे आणि अमृता रावराणे या तिन्ही अभिनेत्री सध्या ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहेत. काही दिवसांपूर्वीच या मालिकेत नेत्राने विरोचकाचा वध केल्यामुळे रुपालीची या मालिकेतून एक्झिट झाल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र, आता शतग्रीवच्या रुपात नेत्रावर पुन्हा एकदा संकट आलं आहे. शतग्रीवची भूमिका ऐश्वर्या नारकर साकारत आहेत. या मालिकेत ऑनस्क्रीन अनेक ट्विस्ट येत असतात. पण, हे सगळे कलाकार ऑफस्क्रीन तेवढीच मजा – मस्ती करताना दिसतात.

ऐश्वर्या नारकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असतात. आपल्या दैनंदिन जीवनातील विविध अपडेट्स त्या इन्स्टाग्राम स्टोरी, पोस्टच्या माध्यमातून चाहत्यांना देत असतात. अनेकदा अभिनेत्री ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेच्या सेटवर ऑफस्क्रीन काय-काय धमाल केली जाते याचे व्हिडीओ शेअर करतात. याशिवाय या मालिकेतील सगळ्या अभिनेत्री मिळून विविध गाण्यांवर रील्स देखील बनवत असतात. सध्या ऐश्वर्या यांनी शेअर केलेला असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

हेही वाचा : ठरलं तर मग : रविराज उचलणार मोठं पाऊल! प्रियाला सर्वांसमोर थेट कानाखाली मारणार; ‘त्या’ कृतीवर संताप, पाहा प्रोमो

ऐश्वर्या नारकर यांनी व्हिडीओला दिलं हटके कॅप्शन

गेल्या काही दिवसांपासून ‘चिन टपाक डम डम…’ हा ऑडिओ इन्स्टाग्रामवर प्रचंड व्हायरल होत आहे. ‘चिन टपाक डम डम’ हा ऑडिओ लोकप्रिय कार्टून शो ‘छोटा भीम’मधून घेण्यात आला आहे. हा संवाद सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे. अनेकांनी या ऑडिओवर विविध गाणी मिक्स करून रिमिक्स व्हर्जन तयार केले आहेत. ‘चिन टपाक डम डम…’ आणि ‘बिग बॉस’ फेम सूरज चव्हाणचा ‘बुक्कीत टेंगूळ…’ असे दोन संवाद वापरून तयार केलेल्या एका रिमिक्स व्हर्जनवर ऐश्वर्या, तितीक्षा आणि अमृताचा जबरदस्त अंदाज पाहायला मिळाला. या ऑडिओवर तिन्ही अभिनेत्री पारंपरिक लूक करत बेभान होऊन नाचल्या आहेत.

ऐश्वर्या नारकर ( Aishwarya Narkar ) यांनी सूरज चव्हाणचा लोकप्रिय डायलॉग ‘गुलीगत धोका’ याला अनुसरून ‘गुलीगत पोरी’ असं कॅप्शन या व्हिडीओला दिलं आहे. त्यामुळे सूरजची क्रेझ दिवसेंदिवस सोशल मीडियावर वाढत असल्याचं स्पष्ट होत आहे.

हेही वाचा : “माझी लायकी काढली, मतिमंद, बालिश…”, जान्हवीशी कडाक्याचं भांडण का झालं? घन:श्याम म्हणाला, “तिला नेहमी…”

कॅप्शनने वेधलं लक्ष ( Aishwarya Narkar )

दरम्यान, ऐश्वर्या ( Aishwarya Narkar ) यांनी शेअर केलेल्या व्हिडीओवर तितीक्षाचा नवरा सिद्धार्थने कमेंट करत “कडक…” म्हटलं आहे. याशिवाय सुरुची अडारकर, एकता या अभिनेत्रींनी या तिघींचं कौतुक केलं आहे. नेटकऱ्यांनी देखील या हटके व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.