मराठमोळी अभिनेत्री अक्षया देवधर २ डिसेंबरला अभिनेता हार्दिक जोशीसह विवाहबद्ध झाली. अक्षया-हार्दिकच्या लग्नाची चर्चा काही केल्या संपत नाहीये. त्यांच्या शाही विवाहसोहळ्यातील हळदी, संगीत व मेहंदी कार्यक्रमातील फोटो सोशल मीडियावर अजूनही व्हायरल होत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून घराघरात पोहोचलेल्या राणादा-पाठकबाईंचा चाहता वर्गही मोठा आहे. अक्षया व हार्दिक दोघेही सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करतात. नुकतंच अक्षयाने तिचा कारमधील एक सेल्फी इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला आहे. या सेल्फीमध्ये नववधू अक्षयाचा लूक पाहायला मिळत आहे.

हेही वाचा>>कोणाबरोबर घेतला सेल्फी तर कोणाचं केलं तोंडभरुन कौतुक; रणवीर सिंग ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांच्या प्रेमात

हेही वाचा>> “राखी सावंतला मॉलमध्ये बघताच माझी आई जोरात ओरडली अन्…” सोनाली कुलकर्णीने सांगितला ‘तो’ किस्सा

साडी व त्यावर मॅचिंग डिझायनर ब्लाऊज परिधान करत अक्षयाने मराठमोळा लूक केला आहे. हातात हिरवा चुडा, कपाळावर टिकली व गळ्यातील मंगळसूत्र असा साज अक्षयाने केला आहे. पण अक्षयाच्या लूकपेक्षा तिच्या कॅप्शनने चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. अक्षयाने हा फोटो शेअर करत “मिसेस जोशी” असं कॅप्शन दिलं आहे.

हेही वाचा>>समीर चौगुलेंना चाहत्याने बनवलं स्पायडरमॅन; अभिनेता पोस्टवर कमेंट करत म्हणाला…

अक्षया व हार्दिकने पुण्यात सप्तपदी घेत त्यांच्या नव्या आयुष्याला सुरुवात केली. मालिकेतील त्यांच्या जोडीला चाहत्यांनी पसंती दर्शविली होती. राणादा-पाठकबाई या रील लाइफ जोडीने खऱ्या आयुष्यातही लग्नगाठ बांधल्याने चाहते आनंदी आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshaya deodhar shared photo with caption mrs joshi after married with hardeek joshi kak