scorecardresearch

कोणाबरोबर घेतला सेल्फी तर कोणाचं केलं तोंडभरुन कौतुक; रणवीर सिंग ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांच्या प्रेमात

रणवीर सिंगने केलं ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांचं कौतुक, म्हणाला..

कोणाबरोबर घेतला सेल्फी तर कोणाचं केलं तोंडभरुन कौतुक; रणवीर सिंग ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधील कलाकारांच्या प्रेमात
रणवीर सिंगने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मध्ये हजेरी लावली. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमातील विनोदवीर प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. या शोमध्ये बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगने हजेरी लावली.

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चित्रपटाची संपूर्ण टीम प्रमोशनकरिता महाराष्ट्राचा लाडका शो हास्यजत्रेत सहभागी झाली होती. विनोदाचं अचूक टायमिंग साधत हास्यजत्रेतील सगळ्याच विनोदवीरांनी रणवीर सिंगसह सर्कस चित्रपटातील कलाकरांना पोट धरुन हसायला भाग पाडलं. हास्यवीरांचे अफलातून विनोद व त्यांच्या अभिनयाची भूरळ रणवीर सिंगलाही पडली आहे. रणवीरने हास्यजत्रा शो व त्यातील कलाकारांचं कौतुक केलं आहे. दिग्दर्शक सचिन गोस्वामी यांनी हास्यजत्रेच्या सेटवरील रणवीर सिंगचा व्हिडीओ शेअर केला आहे.

“मला मनोरंजन विश्वात आज १२ वर्ष झाली. या दरम्यान चित्रपटाच्या प्रमोशनकरिता मी अनेक शोमध्ये हजेरी लावली. पण आजचा दिवस मी कधीच विसरू शकत नाही. हास्यजत्रेच्या स्कीटसाठी केलं जाणारं लिखाण, कलाकारांचा अभिनय, सेटची उभारणी हे सगळंच उत्कृष्ट दर्जाचं आहे. एक अभिनेता म्हणून या सगळ्यासाठी किती कष्ट घेतले जात असतील याची मला कल्पना आहे. हास्यजत्रेच्या संपूर्ण टीमला खूप सारं प्रेम”, असं रणवीर म्हणला.

हेही वाचा>> “…तेव्हा मला आईने झाडूने मारलं होतं” प्राजक्ता माळीने सांगितला ‘तो’ किस्सा

पुढे हास्यजत्रेतील कलाकारांचं कौतुक करत तो म्हणाला, “तुमचं टॅलेन्ट व तुमची एनर्जी सगळ्यात जास्त आहे. सगळे एकापेक्षा एक आहेत. त्यामुळे स्किट बघताना नक्की कोणाकडे लक्ष द्यायचं हे कळतंच नाही. या शोमधून तुम्ही प्रेक्षकांना हसवत आहात. त्यांना आनंद देत आहात. हास्यजत्रेचं स्किट लाइव्ह बघण्याची प्रेक्षकांना संधी मिळाली तर हजारो प्रेक्षक इथे गर्दी करतील”. रणवीर सिंग व सर्कस चित्रपटाच्या टीमबरोबरचा हास्यजत्रेचा भाग १८ व १९ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा >> ‘बेशरम रंग’ वादाच्या भोवऱ्यात असताना शाहरुख खानच्या दिग्दर्शकाने दिली गुडन्यूज, लवकरच होणार बाबा

रणवीर सिंग मुख्य भूमिकेत असलेला ‘सर्कस’ हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहुर्तावर येत्या २३ डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात रणवीरसह जॅकलीन फर्नांडिस, पूजा हेगडे, दीपिका पदुकोण हे कलाकरही महत्त्वाच्या भूमिका साकारणार आहेत. याबरोबरच मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधवही या चित्रपटात झळकणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-12-2022 at 15:31 IST

संबंधित बातम्या