Akshaya Hindalkar’s Entry In Sab Tv’s Pushpa LLB : अक्षया हिंदळकर मराठी मालिकाविश्वातील लोकप्रिय चेहरा आहे. तिने आजवर मालिकांमध्ये मुख्य नायिका आणि सहाय्यक अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. शेवटची ती ‘स्टार प्रवाह’वरील ‘अबोली’ मालिकेत झळकलेली. अशातच आता अभिनेत्रीची एका लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली आहे.

अक्षया हिंदळकर त्यापूर्वी ‘झी मराठी’वरील ‘पुन्हा कर्तव्य आहे’मध्ये झळकलेली. या मालिकेतील तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळालेला. अशातच आता तिची ‘सब टीव्ही’वरील लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली आहे, याबद्दलची माहिती तिने सोशल मीडियावर पोस्ट करत दिली आहे.

अक्षया हिंदळकरची ‘पुष्पा एलएलबी’मध्ये एन्ट्री

अक्षया हिंदळकरची ‘सब टीव्ही’वरील लोकप्रिय मालिका ‘पुष्पा एलएलबी’मध्ये एन्ट्री झाली आहे. या मालिकेत तिचा मॉर्डन लूक असल्याचं पाहायला मिळतं. अक्षयासह तिची बहीण व इंडस्ट्रीतील तिच्या कलाकार मित्र-मैत्रिणींनीही सोशल मीडियावर पोस्ट करत तिचं अभिनंदन केलं आहे.

अक्षयाची एन्ट्री झालेली ‘पुष्पा एलएलबी’ ही मालिका रात्री ९.३० वाजता ‘सब टीव्ही’वर प्रसारित होते. नुकतच या मालिकेने ७ वर्षांचा लीप घेतला असून आता पुष्पा वकील झाल्याचं दिसतं. लिपनंतर मालिकेत काही बदल झाले असून यामध्ये आता मराठमोळ्या अभिनेत्रीची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे आता अक्षयाच्या भूमिकेने या मालिकेत कोणता ट्वीस्ट येणार तसेच तिची भूमिका नेमकी कशी आहे हे मालिकेच्या आगामी भागात पाहायला मिळेल.

दरम्यान, मराठीत काम करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकल्यानंतर आता अक्षयाची हिंदी मालिकाविश्वात एन्ट्री झाली आहे, त्यामुळेच अक्षयाची मैत्रीण अभिनेत्री रुपल नंदानेही इन्स्टाग्रामवर स्टोरी पोस्ट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. यासह तिच्या आईनेही तिचं अभिनंदन केलं आहे. अक्षयाने यापूर्वी ‘तुझ्या इश्काचा नादखुळा’, ‘पुन्हा कर्तव्य आहे’, ‘सरस्वती’, ‘अबोली’ या मालिकेत काम केलं आहे; तर यासह तिने ‘रॉकी’ चित्रपटात काम करत मराठी इंडस्ट्रीत पदार्पण केलं होतं. अक्षयाला अभिनयाबरोबरच नृत्याचीही आवड असून ती सोशल मीडियावर अनेकदा डान्सचे व्हिडीओ पोस्ट करत असते.