कलाकारांचे स्टायलिस्ट फोटो सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरतात. कलाकारांचं खास फोटोशूट हा चाहत्यांचा आवडीचा विषय. काही कलाकार मंडळी तर न्यूड फोटोशूट, टॉपलेस फोटोशूट करतात. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होताना दिसतात. असंच आता अभिनेत्री आशा नेगीच्या बाबतीत घडलं आहे. आशाने टॉपलेस फोटोशूट केलं आहे. तिच्या या फोटोंची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘पवित्र रिश्ता’ या मालिकेमुळे आशा घराघरांत पोहोचली. या मालिकेनंतर तिच्या चाहतावर्गामध्येही प्रचंड वाढ झाली. आशा छोट्या पडद्यापर्यंतच मर्यादित राहिली नाही. तिने बॉलिवूडमध्येही पदार्पण केलं. ‘ल्युडो’ या चित्रपटामध्ये तिने अभिषेक बच्चनबरोबर काम केलं आहे. एकीकडे आशा तिच्या कामामुळे चर्चेत असताना दुसरीकडे तिच्या टॉपलेस फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

आणखी वाचा – ‘घर बंदूक बिरयानी’नंतर नागराज मंजुळेंची मोठी घोषणा, नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत म्हणाले, “भारताचं व महाराष्ट्राचं नाव…”

आशाने शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने फक्त अंगाभोवती टॉवेल गुंडाळलेला दिसत आहे. तसेच तिचा हा फोटो तिच्या बेडरुममधील असल्याचं दिसत आहे. तिने बेडवर बसून हे हॉट फोटोशूट केलं आहे. आशाच्या या फोटोंवर अनेकांनी विविध कमेंट केल्या आहेत. काहींनी तिच्या या लूकचं कौतुक केलं आहे तर काहींनी तिला ट्रोल करण्यासही सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – शिव ठाकरे ‘खतरों के खिलाडी’मध्ये जाण्यासाठी करतोय जोरदार तयारी, म्हणाला “मला पाण्याची भीती वाटते, पण…”

आशाने हे फोटो शेअर करत म्हटलं की, “एकदा बेडवर बसून नाश्ता करण्यास मीही पात्र आहे”. आशाचा हा फोटो पाहून मराठमोळी अभिनेत्री अमृता खानविलकरने कमेंट केली आहे. आशाचा हा फोटो अमृताला खूपच आवडला आहे. तिने कमेंट करत म्हटलं की, “बेबी सो हॉट”. तर काहींनी तिला या फोटोंवरुन ट्रोल केलं आहे. तुला असा लूक शोभत नाही, चर्चेत राहण्यासाठी असं करु नको अशा अनेक कमेंट केल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Amruta khanvilkar comment on actress asha negi topless photos says baby so hot see details kmd