‘अप्पी आमची कलेक्टर’ मालिका सध्या रंजक वळणावर आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन सतत अप्पीचा शोध घेताना दिसतोय. शेवटी अमोलच्या हट्टापायी त्याने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अर्जुन नरसोबाची वाडीला जातो. त्याने या ठिकाणी रस्त्याजवळ एका मुलीला पाहिलेलं असतं. रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाडीवर काम करणाऱ्या या मुलीचं नाव असतं दीपा. यावेळी अर्जुन तिच्याबद्दल आणखी जाणून घ्यायला उत्सुक होतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपाचा रांगडा स्वभाव पाहून तो चांगलाच प्रभावित होतो. त्यात ती मुलगी दिसायला अगदी अप्पीसारखी असते. ती एका माणसाला झाऱ्याने मारण्याची धमकी देते आणि त्याच्याकडून पैसे घेण्याचा प्रयत्न करतेय. हे बघून अर्जुन संभ्रमित आहे. कोण आहे ही मुलगी? तिच्या कुटुंबाची पार्श्वभूमी काय आहे? हे जाणून घेण्यासाठी तो तिचा पाठलाग करतो. पाठलाग करताना अचानक ती त्याच्यासमोर येऊन विचारते, “तू माझा पाठलाग का करत आहेस?” अर्जुन खोटं सांगतो की, त्याला वाटतं ही त्याची नातेवाईक आहे. मात्र, तिच्या वागणुकीतून आणि बोलण्याच्या पद्धतीतून अर्जुनला जाणवतं की ही अप्पी नसावी.

दरम्यान, घरी पत्रकार अमोलला त्याच्या आईविषयी प्रश्न विचारतात. अमोल गोंधळून जातो. हळूहळू, त्याच्या मनात भीती निर्माण होते की अप्पी आता या जगात नाही. या सगळ्या गोंधळामुळे अमोल रडायला लागतो. त्याच वेळी, चिंचुकेचा अर्जुनला फोन येतो, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अप्पीच्या अपघाताचा तपशीलवार अहवाल मागितला आहे आणि तो उद्या सादर करायचा आहे. अर्जुनवर एकाच वेळी अनेक प्रश्नांचा भार पडतो.

अप्पी जिवंत आहे का? असेल तर कुठे आहे? नसेल तर अमोलला काय उत्तर द्यायचं? अर्जुन ठरवतो की तो अप्पीला परत आणणार! अप्पी परत येणार? अर्जुन आता दीपाला भेटून काही दिवस फक्त अमोलची तिने अप्पी व्हावं यासाठी प्रयत्न करणार आहे. दीपा घरी आल्यामुळे अमोल आणि घरची मंडळी आनंदात आहेत. सगळे तिच्यावर प्रश्नांचा भडिमार करणार आहेत.

पण, मालिकेचा हा नवीन प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. “सगळ्या मालिकांमध्ये एकच ट्रॅक सुरू आहे बकवास”, “अजून काय अपेक्षित होतं. आता सिरियल ६ महिने तरी चालेल…कोणी पाहत का ही सिरियल…”, “याने टीआरपी वाढणारे का आहे तो पण जाईल”, “एका ऑफिसरला वडे तळताना पाहणं बाकी होतं”, “केले चालू डबल रोल आता”, “लोक मूर्ख आहेत की लेखक? कोण आहेत निर्माते नॉर्मल आहेत का ते?” अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी या प्रोमोवर दिल्या आहेत.

appi amchi collector ( नेटकऱ्यांच्या कमेंट्स )
appi amchi collector ( नेटकऱ्यांच्या कमेंट्स )

दरम्यान, आता अप्पीच्या रुपात आलेली दीपा कशाप्रकारे घरातल्यांच्या प्रश्नांचा सामना करणार या सगळ्या गोष्टी प्रेक्षकांना ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेत पाहायला मिळणार आहेत. ही मालिका ‘झी मराठी’ वाहिनीवर ६.३० वाजता प्रसारित केली जाते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Appi amchi collector lead actress in different look new twist netizens slams makers sva 00