‘बिग बॉस १६’चं विजेतेपद मिळवल्यापासून एमसी स्टॅन चर्चेत आहे. बिग बॉसमुळे स्टॅनच्या चाहत्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. चाहत्यांसाठी स्टॅनने संपूर्ण देशभरात त्याचे कॉन्सर्ट आयोजित केले आहेत. त्याच्या कॉन्सर्टलाही चाहते गर्दी करत आहेत. १७ मार्चला स्टॅनचं इंदौरमध्ये कॉन्सर्ट आयोजित केलं होतं. परंतु, कॉन्सर्टदरम्यान बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी हंगामा करत ते बंद पाडल्याचं समोर आलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रॅपर एमसी स्टॅनच्या गाण्यावर बजरंग दलने आक्षेप घेतला आहे. रॅपमधून शिवीगाळ व महिलांबाबत करत असलेल्या वक्तव्याला बजरंग दलच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. स्टॅन त्याच्या गाण्यांमधून ड्रग्जसारख्या गोष्टींना प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही बजरंग दलने केला आहे. त्यामुळे देशातील तरुण पिढी वाईट मार्गावर जाण्यासाठी प्रवृत्त होत असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.

हेही वाचा>> Video: …अन् अमरावतीच्या अंबाबाई मंदिरासमोर सोनाली कुलकर्णीचा गोंधळ; व्हिडीओ व्हायरल

स्टॅनच्या इंदौर येथील कॉन्सर्टमधील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये बजरंग दलचे कार्यकर्ते स्टॅनच्या कॉन्सर्टदरम्यान स्टेजवर जाऊन बोलताना दिसत आहेत. बजरंग दलच्या कार्यकर्त्यांकडून स्टॅनचं इंदौरमधील कॉन्सर्ट रद्द केल्यानंतर त्याच्या चाहत्यांकडून ट्विटरवर ‘स्टँड विथ एमसी स्टॅन’ हा हॅशटॅग ट्रेंड करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारानंतर स्टॅनच्या चाहत्यांनी त्याला पाठिंबा दर्शविला आहे.

हेही वाचा>> “…त्यानंतर मी चार दिवस जेवलो नाही”, ‘त्या’ चित्रपटाच्या अपयशानंतर प्रसाद ओकची अशी झालेली अवस्था, म्हणाला “लोकांना…”

हेही वाचा>> Video: स्टेजवर गात होता एमसी स्टॅन, गर्दीतून कुणीतरी बाटली फेकली अन्…; कॉन्सर्टमधील व्हिडीओ व्हायरल

रॅपरच्या कॉन्सर्टमध्ये यापूर्वी प्रेक्षकांच्या गर्दीमधून पाण्याची बाटली स्टेजवरील स्टॅनला फेकून मारण्यात आली होती. तेव्हाही स्टॅनने कॉन्सर्ट रद्द केलं होतं. दरम्यान, शनिवारी(१८ मार्च) स्टॅनचं नागपूरमध्ये तर १९ मार्चला पुण्यात कॉन्सर्ट होणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bajrang dal cancelled bigg boss 16 winner mc stan concert in indore video kak