शिव ठाकरेसाठी महेश मांजरेकरांची खास पोस्ट, ‘बिग बॉस’ स्टारचा फोटो शेअर करत म्हणाले... |bigg boss 16 mahesh manjarekar supports shiv thakare shared special post | Loksatta

शिव ठाकरेसाठी महेश मांजरेकरांची खास पोस्ट, ‘बिग बॉस’ स्टारचा फोटो शेअर करत म्हणाले…

Bigg Boss 16: महेश मांजरेकरांचा शिव ठाकरेला पाठिंबा

mahesh manjarekar on shiv thakare
महेश मांजरेकरांचा शिव ठाकरेला पाठिंबा. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘बिग बॉस हिंदी’चं १६वं पर्व अंतिम टप्प्यात आलं आहे. यंदाच्या पर्वाचे टॉप ५ फायनलिस्ट मिळाले आहेत. मराठमोळ्या शिव ठाकरेनेही टॉप ५ स्पर्धकांच्या यादीत स्थान मिळवलं आहे. दिलखुलास स्वभावाने घरातील सदस्यांसह प्रेक्षकांची मनं जिंकलेल्या शिवसाठी दिग्दर्शक महेश मांजरेकरांनी खास पोस्ट शेअर केली आहे.

महेश मांजरेकरांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शिव ठाकरेचा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी “पात्र असलेला स्पर्धक” असं कॅप्शन त्यांनी दिलं आहे. शिवचा फोटो शेअर करत महेश मांजरेकरांनी त्याला पाठिंबा दर्शविला आहे. याबरोबरच ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाची ट्रॉफी त्याच्या नावावर व्हावी, यासाठी चाहत्यांना वोट करण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे.

हेही वाचा>> Video: कुराणवर हात ठेवत राखी सावंतसमोरच आदिलने घेतली होती शपथ; अटक झाल्यानंतर व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>> Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाआधी ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

महेश मांजरेकर हे ‘बिग बॉस मराठी’चं सूत्रसंचालन करतात. ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वात शिव ठाकरे सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. ‘बिग बॉस हिंदी’च्या घरातही शिवने पहिल्या दिवसापासूनच त्याचा खेळ दाखवायला सुरुवात केली होती. घरातील सर्वाधिक चर्चेत असणाऱ्या चेहऱ्यांपैकी शिव एक आहे.

हेही पाहा>> Photos: अटक झालेला राखी सावंतचा पती तिच्यापेक्षा १७ वर्षांनी लहान, जाणून घ्या आदिल खानची एकूण संपत्ती

‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा अंतिम सोहळा १२ फेब्रुवारीला पार पडणार आहे. यादिवशी ‘बिग बॉस हिंदी’ला नवा विजेता मिळणार आहे. शिव ठाकरेबरोबर एम.सी.स्टॅन, शालिन भनोट, प्रियंका चौधरी, अर्चना गौतम हे स्पर्धक टॉप ५ फायनलिस्ट ठरले आहेत. आता यांच्यापैकी ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाच्या ट्रॉफीवर कोण नाव कोरणार, हे पाहावं लागेल.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 18:09 IST
Next Story
सुबोध भावेनंतर ‘हा’ आघाडीचा अभिनेता साकारणार बालगंधर्व यांची भूमिका, फोटो व्हायरल