scorecardresearch

Sidharth-Kiara Wedding: सिद्धार्थ-कियाराच्या लग्नाआधी ‘शेरशाह’ चित्रपटातील ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

सिद्धार्थ-कियारा यांनी ‘शेरशाह’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केली होती.

sidharth kiara weddding
सिद्धार्थ-कियाराचा व्हिडीओ व्हायरल. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

बॉलिवूडमधील सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी हे लोकप्रिय कपल आज विवाहबंधनात अडकणार आहेत. सिद्धार्थ व कियाराच्या लग्नासाठी जय्यत तयारी सुरू आहे. जैसलमेरमधील सूर्यगड पॅलेसवर सिद्धार्थ-कियाराचा शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. बॉलिवूडमधील सेलिब्रिटी त्यांच्या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असणार आहेत.

सिद्धार्थ-कियारा यांनी ‘शेरशाह’ चित्रपटात पहिल्यांदा एकत्र स्क्रीन शेअर केली होती. त्यांच्या जोडीला प्रेक्षकांनीही पसंती दर्शविली होती. याच चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सिद्धार्थ-कियारामध्ये जवळीक वाढली. आता त्यांच्या लग्नाच्या पूर्वी शेरशाह चित्रपटातील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ‘फिल्मवाला’ या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आलेल्या हा व्हिडीओ सिद्धार्थ व कियाराच्या संवादाचा आहे.

हेही वाचा>> Video: मारहाण, पैसे चोरल्याचा आरोप केल्यानंतर राखी सावतंची आदिल खानबरोबर डिनर डेट, नवऱ्याला भरवला घास अन्…; व्हिडीओ व्हायरल

हेही वाचा>>स्मृती इराणींच्या मुलीचं नाव शाहरुख खानने ठेवलं? खुलासा करत म्हणाल्या…

“मी तुझ्याबरोबर फक्त चाळीस दिवस होतो, अशी तुझी तक्रार होती. आता मी तुझ्यासोबत ४० वर्ष असणार आहे” असं सिद्धार्थ कियाराला म्हणाताना दिसत आहे. शेरशाह चित्रपटात सिद्धार्थने कर्नल विक्रम बत्रा तर कियाराने डिंपल चीमा ही भूमिका साकारली होती.

हेही वाचा>> “मी नमाज पठण करत असताना आदिलने लाथेने…”, राखी सावंतने सांगितला ‘तो’ प्रसंग

सिद्धार्थ व कियाराच्या लग्नासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. लग्नातील पाहुण्यांसाठी पॅलेसवरील तब्बल ८४ खोल्यांचं बुकिंग करण्यात आलं आहे. याशिवाय पाहुण्यांसाठी चोख बंदोबस्तही करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 07-02-2023 at 13:30 IST