बिग बॉस १६ मध्ये गेल्या आठवड्यात प्रकृती ठीक नसल्याने सलमान खान ‘वीकेंड का वार’मध्ये दिसला नाही आणि करण जोहर त्याच्या जागी आला होता. पण आता सलमान खान पुन्हा एकदा शोमध्ये परतला आहे. पुन्हा एकदा तो त्याच्या दमदार स्टाइलमध्ये घरातील सदस्यांना सुनावताना आणि समजावताना दिसत आहे. नव्या व्हिडीओमध्ये सलमान खान घरातील सदस्यांना असे प्रश्न विचारत असल्याचे दिसून येते की शिव ठाकरे आणि शालीन भानोत यांच्यात जोरदार भांडण झालेलं दिसतंय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सलमान खान आणि बिग बॉस या ‘विकेंड का वार’मध्ये सदस्यांसह कानशीलात मारण्याचा खेळ खेळताना दिसला. यावेळी अर्चनाला सर्वात आधी मार खावा लागला. त्यानंतर शालीन भानोत त्या खुर्चीवर बसला. खेळाचा नियम हा होता की खुर्चीवर बसलेल्या सदस्याबाबत प्रश्न विचारला जाणार आणि त्याचं उत्तर घरातील इतर सदस्यांना द्यायचं आहे. एकमताने सर्व सहमत असतील तर त्या सदस्याला चपराक बसणार आहे.

आणखी वाचा- Video : वीणा जगतापला डेट केल्यानंतर ‘बिग बॉस १६’मध्ये शिव ठाकरेला मिळाली नवी गर्लफ्रेंड? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण

या खेळात जेव्हा शालीन भानोत खुर्चीवर बसतो तेव्हा सलमान खान पहिला प्रश्न विचारतो की शालीन भानोत रंग बदलणाऱ्या सरड्याप्रमाणे आहे का? यावर शालीनला चपराक बसली. यानंतर पुढील प्रश्न असा होता की, शालीन सुंबुलचा वापर करतो का? या प्रश्नाच्या उत्तरात शिव सहमती दर्शवतो की होय शालीन ​​सुंबुलचा वापर करतो. त्यावरू शालीन आणि शिव यांच्यात वाद होतात.

शिवच्या बोलण्यावर शालीन भानोत आणि शिव ठाकरे यांच्यात वाद सुरू होतो. दरम्यान शालीन म्हणतो, “शिव तू माझ्याकडे ये, तुला काही अभिनय शिकायला हवा.” यावर शालीनला प्रत्युत्तर देताना शिव म्हणतो, “फक्त रिअॅलिटी शोसाठी तुला माझ्याकडून शिकण्याची गरज आहे कारण रिअॅलिटी शोमध्ये खरंही वागायला पाहिजे.” शिवच्या या उत्तरावर शालीनचा चेहरा पाहण्यालायक होतो. तर सलमान खान मराठमोळ्या शिव ठाकरेच्या उत्तराने इम्प्रेस झालेला दिसतो.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 salman khan impress by shiv thakare answer to shalin bhanot mrj