‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाचा विजेता ठरलेला एमसी स्टॅन सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. पुण्याचा रॅपर असलेल्या एमसी स्टॅनने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. स्टॅनची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून चाहत्यांमध्ये त्याची क्रेझ असल्याचं पाहायला मिळत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘बिग बॉस’च्या विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनने शेअर केलेल्या पोस्टला विराट कोहलीच्या पोस्टपेक्षाही जास्त लाइक्स मिळाले. त्यानंतर त्याने गुरुवारी(१६ फेब्रुवारी) चाहत्यांसाठी केलेलं इन्स्टाग्राम लाइव्हही प्रचंड चर्चेत होतं. या लाइव्हमध्ये चाहत्यांसाठी त्याने गाणं गायलं. १० मिनिटांसाठी केलेल्या इन्स्टाग्राम लाइव्हमध्ये स्टॅनला तब्बल ५ लाख ४१ हजार चाहते पाहत होते. इन्स्टा लाइव्हला इतके जास्त व्ह्यूज मिळणारा स्टॅन पहिला भारतीय सेलिब्रिटी ठरला. त्याने शाहरुख खानचा विक्रम मोडून नवा विक्रम रचला .

हेही वाचा>> गौरी व जयदीपचा ऑनस्क्रीन रोमान्स पाहून ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मालिकेवर प्रेक्षकांचा संताप, म्हणाले “आमच्या मुलांवर…”

हेही वाचा>> Video: छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती, बाजीप्रभू देशपांडेंचा फोटो अन्…; ‘पावनखिंड’ फेम अभिनेत्याने दाखवली विशाळगडाच्या पायथ्याशी बांधलेल्या घराची झलक

एमसी स्टॅन ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली आहे. इन्स्टाग्रामवर एमसी स्टॅनचे फॉलोवर्स पाच पटीने वाढले आहेत. ‘बॉलिवूड लाइफ’च्या वृत्तानुसार, ‘बिग बॉस’मध्ये येण्याआधी एमसी स्टॅनचे इन्स्टाग्रामवर फक्त १.२ मिलियन फॉलोवर्स होते. आता स्टॅनच्या इन्स्टाग्राम फॉलोवर्सने ९ मिलियनचा टप्पा गाठला आहे. सध्या रॅपरला इन्स्टाग्रामवर ९.३ मिलियन चाहते फॉलो करतात. तर एमसी स्टॅन इन्स्टाग्रामवर कोणालाही फॉलो करत नाही.

हेही वाचा>> “गर्भपातानंतर १० दिवसांतच आदिलने माझ्याबरोबर शरीरसंबंध…” राखी सावंतचा पतीबाबत धक्कादायक खुलासा

‘बिग बॉस’ विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅनच्या मानधनातही वाढ झाली आहे. रॅपर एमसी स्टॅन पूर्वी एका इन्स्टाग्राम स्टोरीसाठी ५-७ लाख रुपये मानधन घ्यायचा. आता त्याला इन्स्टा स्टोरीसाठी ८-१० लाख रुपये मिळतात. तर एका रीलसाठी स्टॅनला १८-२३ लाख रुपये मिळायचे. ‘बिग बॉस’चा विजेता झाल्यानंतर स्टॅनच्या रीलसाठीच्या मानधनात ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss 16 winner mc stan instagram followers increased by 5 percent after show kak