Bigg Boss 19 Nominations List : टीव्हीवरील लोकप्रिय रिअ‍ॅलिटी शो ‘बिग बॉस १९’ला सुरुवात होऊन आता सात आठवडे पूर्ण झाले आहेत. दिवसेंदिवस या शोला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत आहे. घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांचा प्रवास आता हळूहळू अधिक कठीण बनत चालला आहे, तसेच घरातील एकेक स्पर्धकाचा प्रवास संपतही आहे.

गेल्या आठवड्यात कोणताच स्पर्धक घराबाहेर गेला नव्हता. त्याउलट गेल्या आठवड्यात घरात एका वाइल्ड कार्ड स्पर्धकाची एन्ट्री झाली होती. मात्र, या आठवड्यात ‘बिग बॉस’मधून अभिनेता झीशान कादरीचा प्रवास संपणार असल्याचं काही वृत्तांमधून समोर येत आहे. झीशान घराबाहेर पडताच लगेचच एक नवीन नॉमिनेशन टास्क होणार आहे, जिथे पुन्हा एकदा स्पर्धक एकमेकांना नॉमिनेट करतील.

आठव्या आठवड्यात घरातील सदस्यांनी वाइल्ड कार्ड स्पर्धक मालती चाहरला घराबाहेर पडण्यासाठी म्हणून नॉमिनेट केलं आहे. मालतीसह घरातील आणखी तीन सदस्यही नॉमिनेट होणार आहेत. हे तीन स्पर्धक कोण आहेत? चला जाणून घेऊया. ‘बिग बॉस’शी संबंधित अपडेट्स देणाऱ्या ‘बिग बॉस तक’ या पेजनुसार मृदुल तिवारी, मालती चाहर, गौरव खन्ना व नीलम गिरी हे चौघे या आठवड्यात नॉमिनेट झाले आहेत.

या आठवड्यातला नॉमिनेशन टास्क अगदी हटके आहे. त्यामध्ये घरात पाणीपुरीचा स्टॉल लावला जातो. प्रत्येक स्पर्धकाला त्याच्या सह-प्रतिस्पर्ध्यांना पाणीपुरी खाऊ घालून नॉमिनेट करायचं असतं. प्रत्येक सदस्य जास्तीत जास्त पाच पाणीपुरी खाऊ घालू शकतो. ज्याला सर्वाधिक पाणीपुरी दिल्या जातील, तो सदस्य नॉमिनेशनच्या लिस्टमध्ये सहभागी होईल.

बिग बॉस १९ व्हिडीओ

नॉमिनेट झालेल्यांपैकी कोणताही स्पर्धक बाहेर गेला तरी प्रेक्षकांचं निराश होणं साहजिक आहे. कारण- तिघेही अगदी उत्तम स्पर्धक आहेत. पण काही चर्चा अशाही आहेत की, येणाऱ्या आठवड्यात दिवाळीनिमित्त मेकर्स कोणतंही एव्हिक्शन टाळू शकतात. त्यामुळे आता बिग बॉसच्या घरात येत्या आठवड्यात काय घडतंय? हे पाहणे रसिकांसाठी मनोरंजक ठरणार आहे.