Bigg Boss 19 Contestant’s Education : ‘बिग बॉस १९’ची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. अलीकडेच त्यातील एक सदस्य आवेज दरबार ‘बिग बॉस’च्या घरातून बाहेर पडला. ‘बिग बॉस’च्या घरात सदस्यांमध्ये दररोज नवीन वाद, भांडण होताना दिसतात. लोकप्रिय कलाकार ते सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असे अनेक जण या पर्वात सहभागी झाल्याचे पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का या सर्व स्पर्धकांमध्ये सगळ्यात जास्त शिकलेलं कोण आहे?
‘बिग बॉस’च्या घरात तान्या मित्तल, गौरव खन्ना, कुनिका सदानंद, अशनूर कौर, अमाल मलिक, प्रणित मोरे हे स्पर्धक नेहमी कुठल्या न कुठल्या कारणामुळे चर्चेत असतात. पण हे सर्व स्पर्धक किती शिकले आहेत, त्यांचं शिक्षण किती आहे हे जाणून घेऊयात…
‘बिग बॉस १९’मधील स्पर्धकांचं शिक्षण किती?
तान्या मित्तल – ‘नवभारत टाइम्स’च्या वृत्तानुसार तान्या मित्तल ग्वालियर येथील विद्या पब्लिक स्कूलमधून ग्रॅज्युएट झाली असून, ती आर्किटेक्चरचे शिक्षण घेण्यासाठी चंदिगडला गेलेली. परंतु, व्यवसायावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तिनं ते शिक्षण अर्ध्यातच सोडलं. २६ वर्षीय तान्याचे इन्स्टाग्रामवर २.५ दशलक्षांहून अधिक फॉलोअर्स आहेत.
अमाल मलिक – अमाल मलिक बॉलीवूडमधील लोकप्रिय संगीतकार आहे. त्याला लहानपणापासूनच म्युझिकची आवड होती. त्याने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सांगितलेलं की, त्याची आई ज्योती मलिक शिक्षिका आहे आणि त्यांनी स्पष्ट सांगितलेलं की, करिअरबरोबर शिक्षणही पूर्ण करायचं. अमालनं जमनाबाई नरसी स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं होतं आणि मुंबईतील एनएम कॉलेजमधून कॉमर्समध्ये बॅचलर्सची डिग्री घेतली आहे.
गौरव खन्ना – गौरव खन्ना हिंदी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय चेहरा आहे. अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी त्यानं एक वर्षं आयटी क्षेत्रात मार्केटिंग मॅनेजर म्हणून काम केलं होतं. त्याच्याकडे एमबीएची डिग्री आहे. त्यानं कानपूरच्या सेठ आनंदराम जयपुरिया स्कूलमधून शिक्षण घेतलेलं. त्यानंतर मुंबईत त्यानें पुढचं शिक्षण पूर्ण केलं.
अशनूर कौर – ‘यह रिश्ता क्या कहलाता हैं’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अशनूर हिनं २०१९ मध्ये दहावीत ९३ टक्के मिळवलेले, तर २०२१ मध्ये तिनं १२ वीत ९४ टक्के मिळवले. अलीकडेच तिनं जय हिंद कॉलेजमधून बीएमएममधून शिक्षण पूर्ण केलं आहे.
कुनिका सदानंद – कुनिका सदानंद यांनी कायदेविषयक (Law) शिक्षण घेतलं असून, त्यांनी बॅचलर ऑफ लीगल सायन्स, बॅचलर ऑफ लेजिस्लेटिव्ह लॉ, ह्युमन्स राइट्स यांमध्येही विशेष शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी हैदराबाद येथील नालसार युनिवर्सिटी ऑफ लॉमधून फॉरेन्सिकमधून पदवी मिळवली आहे. कुनिका सदानंद या ‘बिग बॉस १९’च्या घरातील सर्वाधिक शिकलेल्या स्पर्धक आहेत.
प्रणित मोरे – ‘बिग बॉस १९’च्या घरात एकमेव मराठी चेहरा म्हणून ओळखला जाणारा प्रणित या शोमध्ये सहभागी होण्यापूर्वी स्टँडअप कॉमेडी करायचा. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहतावर्ग आहे. प्रणितच्या शिक्षणाबद्दल बोलायचं झालं, तर त्यानं मुंबईच्या सोमय्या कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समधून शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर त्यानं व्यवस्थापन क्षेत्राचा अभ्यास करून पदवी मिळवली आहे. त्यानंतर प्रणीतनं वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अँड रिसर्चमध्ये एमबीएची पदवी मिळवली आहे.