Bigg Boss 19 Winner List Viral : सलमान खानचा शो ‘बिग बॉस १९’ सध्या खूप चर्चेत आहे. जसजसा ग्रँड फिनाले जवळ येत आहे तसतसे स्पर्धक आता प्रचंड सक्रिय झाले आहेत. घरातील ड्रामा, भांडणं वाढली आहेत. स्पर्धकांच्या मैत्रीत, समीकरणात बदल झालेले पाहायला मिळत आहेत. तान्या व फरहाना आता घट्ट मैत्रिणी झाल्या आहेत. तसेच प्रणित मोरेच्या रिएंट्रीची चर्चाही सुरू आहे. याचदरम्यान, या पर्वाच्या विजेत्याचे नाव लीक झाले आहे.
‘बिग बॉस 19’ च्या घरात स्पर्धकांचे वाद चर्चेत असतात. आता शोचा फिनाले जवळ आला आहे, याचदरम्यान सर्वच स्पर्धक वोटसाठी आपल्या चाहत्यांचे मनोरंजन करण्याचा प्रयत्न करत आहेत. चाहतेही आपल्या आवडत्या स्पर्धकांना सोशल मीडियावर पाठिंबा देत आहेत.
सोशल मीडियावर एक लिस्ट व्हायरल झाली आहे. ही लिस्ट पाहून चाहते हैराण झाले आहेत. या लिस्टमध्ये ‘बिग बॉस १९’च्या विजेत्याचे, उपविजेत्यांची नावं आहेत. तसेच जे स्पर्धक घराबाहेर गेले आहेत, त्यांची नावं अनुक्रमे दिली आहेत. या यादीनुसार बिग बॉस १९ चा विजेता कोण होणार, ते जाणून घेऊयात.
कोण असेल ‘बिग बॉस १९’चा विजेता?
सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या यादीनुसार, गौरव खन्ना बिग बॉस १९ चा विजेता ठरणार आहे. अभिषेक बजाज हा पहिला रनर-अप असेल आणि फरहाना भट्ट ही दुसरी रनर-अप असेल. अमाल मलिक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, त्यानंतर तान्या मित्तल चौथ्या क्रमांकावर आहे आणि अशनूर कौर पाचव्या क्रमांकावर आहे.
पाहा यादी
या यादीत एलिमिनेट झालेल्या स्पर्धकांची नावे देखील आहेत. ज्या क्रमाने हे स्पर्धक बाहेर गेले होते, ते दिलंय. यादीनुसार, प्रणीत ७० व्या दिवशी शो सोडणार होता आणि या आठवड्यात आजारपणामुळे त्याला बाहेर पाठवण्यात आलं. जर ही यादी अचूक असेल तर नीलम या आठवड्यात आणि शाहबाज पुढील आठवड्यात एलिमिनेट होईल.
दरम्यान, ही व्हायरल यादी खरी आहे की खोटी याबद्दल काहीच माहिती नाही. पण या यादीनुसार गौरव खन्ना शोचा विजेता असल्याने त्यांचे चाहते खूप आनंदी आहेत. गौरव खन्नाच या शोचा विजेता असेल, हे निर्मात्यांनी आधीच ठरवलंय आणि निर्मात्यांनी याची पुष्टी आधीच केली आहे, अशी चर्चाही सोशल मीडियावर होत आहे.
दुसरीकडे, ही लिस्ट पाहिल्यानंतर काही अमाल मलिकला, तर काही जण फरहानाला पाठिंबा देत आहेत. तसेच ही लिस्ट व्हायरल झाल्यानंतर प्रेक्षक निर्मात्यांवर प्रश्न उपस्थित करत आहेत. जर व्हायरल लिस्ट खरी असेल तर बिग बॉस स्क्रिप्टेड आहे आणि निर्माते लोकांची दिशाभूल करत आहेत, असंही लोक म्हणत आहेत.
