टेलिव्हिजन विश्वात लोकप्रिय असणाऱ्या जोडप्यांपैकी एक जोडी म्हणजे अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांची आहे. १८ नोव्हेंबर २०२३ ला त्यांनी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नाला मराठी कलाकारांनी हजेरी लावली होती. अमृता आणि प्रसाद यांचा लग्नसोहळा थाटामाटात पार पडल्याचे पाहायला मिळाले होते. नुकतेच त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले. या निमित्ताने अमृता आणि प्रसाद यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अमृता-प्रसादच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण

अमृता आणि प्रसाद यांनी सोशल मीडियावर लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना त्यांनी, लग्नाच्या फर्स्ट अ‍ॅनिव्हर्सरीच्या निमित्ताने एक भेट, आमचं लग्न, द फिल्म अशा आशयाची कॅप्शन दिली आहे. त्यामध्ये त्यांच्या लग्नाची तारीखदेखील पाहायला मिळत आहे. या व्हिडीओच्या सुरुवातीला अमृताचा भाऊ अभिषेक देशमुख हा स्टेजवर त्यांचे काही विनोदी किस्से सांगताना दिसत आहे. तो म्हणतो की, अमृताने एक मेसेज केला होता- लग्नात तू कोणते कपडे घालणार आहेस? त्यावर तिचा दीड-दोन दिवसांनी पुन्हा मेसेज आला. रेड असा पहिला मेसेज होता आणि त्यानंतर ड्रेस असा मेसेज होता. अभिषेक असे विनोदी किस्से सांगत असताना जमलेले सगळे हसताना दिसत आहेत. त्यानंतर हळदीचा कार्यक्रम, सगळ्यांचा डान्स या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे.

इन्स्टाग्राम

अमृता प्रसादच्या या व्हिडीओवर अभिषेक, कृतिका, प्रसाद, रश्मी अनपट, आशुतोष गोखले यांनी हार्ट इमोजी शेअर करीत कमेंट्स केल्या आहेत. तसेच चाहत्यांनीदेखील त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

अमृता आणि प्रसाद दोघेही अनेकदा एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करताना दिसतात. त्यांची जोडी प्रेक्षकांची लाडकी जोडी आहे. बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वात या दोघांमध्ये घट्ट मैत्री पाहायला मिळाली होती. या शोमध्येदेखील त्यांची जोडी प्रेक्षकांना आवडली होती. त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. आता त्यांच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले आहे.

हेही वाचा: Bigg Boss 18: सातव्या आठवड्यातील नॉमिनेशन टास्कमध्ये रजत दलालकडे दिला मोठा अधिकार; ‘हे’ सात सदस्य झाले नॉमिनेट

दरम्यान, प्रसाद जवादे सध्या पारू या मालिकेत मुख्य भूमिकेत अभिनय करताना दिसत आहे. प्रसादने यामध्ये आदित्यची भूमिका साकारली आहे. संस्कारी, गुणी, आईचा लाडका आणि तिच्या शब्दाबाहेर नसणारा, अशी आदित्यची व्यक्तिरेखा आहे. त्याच्या या भूमिकेसाठी प्रसादला नुकत्याच पार पडलेल्या झी मराठी अवॉर्ड सोहळ्यात सर्वोत्कृष्ट नायक हा पुरस्कार मिळाला. हा पुरस्कार मिळाल्यानंतर अमृताने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली होती. सोशल मीडियावर अमृता आणि प्रसादचा मोठा चाहतावर्ग असल्याचे पाहायला मिळते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss fame amruta deshmukh prasad jawade shares special video on occasion of first anniversary nsp nsp