Bigg Boss 19 Launch Updates : बहुप्रतीक्षित हिंदी ‘बिग बॉस’चा १९ वा सीझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये या शोचा प्रीमियर होण्याची शक्यता आहे. यंदाच्या सीझनमध्ये एकूण १५ स्पर्धक सहभागी होतील. शो सुरू झाल्यावर जवळपास ३ ते ५ वाइल्ड कार्ड स्पर्धकांची ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री होईल, असं सांगण्यात येत आहे.

‘हिंदुस्थान टाइम्स’ने दिलेल्या माहितीनुसार, सलमान खान ‘बिग बॉस’च्या प्रिमियरला होस्ट म्हणून जबाबदारी सांभाळेल. मात्र, यावर्षी तो संपूर्ण सीझन होस्ट करणार नाही. त्याच्याऐवजी होस्टिंगची जबाबदारी फराह खान, करण जोहर, अनिल कपूर यांच्याकडेही सोपवली जाईल आणि त्यानंतर ग्रँड फिनालेला पुन्हा एकदा सलमान होस्टिंग करण्यासाठी परतणार आहे.

‘बिग बॉस’च्या घरात नव्या पर्वात स्पर्धक म्हणून कोण एन्ट्री घेणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात निर्माण झालेली असते. सध्या सोशल मीडियावर ‘बिग बॉस’च्या १९ व्या पर्वात सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची संभाव्य यादी व्हायरल होत आहे, यामध्ये कोणकोणत्या कलाकारांचा समावेश आहे जाणून घ्या…

Bigg Boss 19 – संभाव्य स्पर्धकांची यादी…

१. राम कपूर व गौतमी कपूर – ही रिअल लाइफ जोडी यंदा ‘बिग बॉस’च्या घरात एन्ट्री घेण्याची शक्यता आहे. ‘बडे अच्छे लगते है’ या मालिकेमुळे राम कपूर घराघरांत लोकप्रिय झाला होता.

२. धीरज धूपर – ‘कुंडली भाग्य’ मालिकेमुळे या अभिनेत्याचा चाहतावर्ग मोठ्या प्रमाणात आहे.

३. अलिशा पनवार – ‘इश्क में मरजावा’, ‘नथ जेवर या जंजीर’ यांसारख्या टीव्ही शोमध्ये तिने काम केलेलं आहे.

४. मुनमुन दत्ता – ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मधील बबिता या भूमिकेसाठी ती प्रसिद्ध आहे.

५. अनिता हसनंदानी – ‘नागिन’ आणि ‘ये है मोहब्बतें’ या मालिकांमुळे अभिनेत्रीला घराघरांत लोकप्रियता मिळाली.

६. लता सबरवाल – ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेमुळे प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री.

७. आशिष विद्यार्थी – राष्ट्रीय पुरस्कार विजेता अभिनेते तसेच अलीकडेच ट्रेटर्स सीझन १ मध्ये सहभागी झाले होते.

८. खुशी दुबे – ‘आशिकाना’ या शोमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती.

९. गौरव तनेजा (फ्लाइंग बीस्ट) – गौरव हा एक प्रसिद्ध YouTuber तसेच तो फिटनेस मार्गदर्शक सुद्धा आहे.

१०. अपूर्वा मुखिजा – इंडियाज गॉट लेटेंटच्या वादामुळे चर्चेत राहिलेली इन्फ्लुएन्सर आणि ‘ट्रेटर्स इंडिया’ सीझन १ मुळे प्रसिद्धीझोतात आली.

११. चिंकी मिंकी (सुरभी आणि समृद्धी मेहरा) – जुळ्या बहिणी आणि YouTube वरील कंटेंट क्रिएटर्स.

१२. पुरव झा – लोकप्रिय क्रिएटर आणि ‘ट्रेटर्स इंडिया’ सीझन १ मुळे प्रसिद्धीझोतात आला.

१३. कृष्णा श्रॉफ – जॅकी श्रॉफ यांची मुलगी.

१४. मिस्टर फैसू (फैसल शेख) – सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आणि यापूर्वी खतरों के खिलाडीमध्ये झालेला सहभागी.

१५. कनिका मान – ‘गुड्डन तुमसे ना हो पायेगा’ मालिकेसाठी प्रसिद्ध आणि ही अभिनेत्री ‘खतरों के खिलाडी’मध्ये देखील झळकली होती.

१६. राज कुंद्रा – उद्योगपती आणि अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती

१७. डेझी शाह – बॉलीवूड अभिनेत्री, नृत्यदिग्दर्शक, तिने जय हो मध्ये सलमान खानसोबत काम केले आहे.

१८. अर्शिफा खान – या अभिनेत्रीने कमी वयातच टेलिव्हिजन विश्वात केलेलं पदार्पण, तिचे फॉलोअर्स देखील मोठ्या प्रमाणात आहेत.

१९. तनुश्री दत्ता – मिस इंडियाचा खिताब जिंकला होता तसेच भारतात #MeToo चळवळीबद्दल प्रसारमाध्यमांसमोर उघडपणे मत मांडलं होतं.

२०. शरद मल्होत्रा ​​- ‘कसम तेरे प्यार की’, ‘नागिन’, ‘बनू मै तेरी दुल्हन’सारख्या शोमुळे प्रसिद्धीझोतात आलेला अनुभवी अभिनेता.

२१. ममता कुलकर्णी – ९० च्या दशकातील बॉलीवूड अभिनेत्री. तसेच या वर्षी महाकुंभमेळ्यादरम्यान किन्नर आखाड्यासाठी महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती झाल्यामुळे ती अलीकडेच चर्चेत आली होती.

२२. पारस कालनावत – ‘अनुपमा’ मालिकेमुळे लोकप्रियता मिळवणारा टीव्ही अभिनेता.

२३. मिकी मेकओव्हर – सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट म्हणून ओळखला जातो.

दरम्यान, ऑगस्ट २०२५ च्या अखेरीस या शोमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांची अंतिम यादी निश्चित केली जाईल.