छोट्या पडद्यावरील सर्वात वादग्रस्त शो म्हणून ‘बिग बॉस’ मराठीला ओळखले जाते. दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्या दिवसांपासूनच बिग बॉसच्या घरात वाद, भांडण आणि गॉसिप्सला सुरुवात झाली आहे. ‘ऑल इज वेल’ या थीमवर बिग बॉसचे पर्व आधारित आहे. बिग बॉस मराठी ४ च्या प्रत्येक आठवड्यातील चावडी ही नेहमीच काही ना काही कारणांमुळे खास ठरत असते. मात्र या आठवड्यातील चावडी ही फारच गाजणारी ठरली आहे. या आठवड्यात कार्यक्रमाचे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांचा स्वतःच्या रागावरचा ताबा सुटणार आहे. याचा एक प्रोमो समोर आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बिग बॉसच्या घरातील सदस्यांनी आठवडाभर खेळलेले टास्क, त्यावेळी केलेली गॉसिप्स, त्यांची वर्तवणूक हे सर्व पाहून ते स्पर्धकांना चांगलंच सुनावणार आहेत. स्पर्धकांनी खेळलेल्या चुकीच्या खेळाबद्दल ते खरपूस समाचार घेताना दिसणार आहेत. यावेळी बिग बॉसच्या चावडीवर ते सर्वात जास्त किरण माने यांना खडे बोल सुनावताना दिसत आहेत.
आणखी वाचा : “ताई पैसे देतो, नाचून दाखवा…” ‘बिग बॉस’च्या घराबाहेर पडताच मेघा घाडगेचा योगेशवर गंभीर आरोप

नुकतंच कलर्स वाहिनीने शेअर केलेल्या प्रोमोनुसार, महेश मांजरेकर हे नेहमीप्रमाणे घरातील सदस्यांची शाळा घेताना दिसत आहेत. यावेळी महेश मांजेरकर किरण माने यांनी या आठवड्यात खेळलेल्या खेळाबद्दल त्यांचा कान पिळताना दिसत आहेत. या आठवड्यात किरण यांनी इतर सदस्यांसोबत वाईट वर्तन केलं याबद्दलही ते त्यांना झापताना दिसत आहे.

तसेच माझ्यासारखा खेळ कुणीही खेळत नाही अशा आवेशात ते असतात, असे मांजरेकराचं म्हणणं आहे. इतकंच नाही तर मांजरेकरांबद्दलही त्यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केलं होतं. मांजरेकर किरण माने यांच्याशी बोलतात, “मी सगळं बघतोय. इथे सगळेच खेळायला आलेत. तिथे कुणाचं वैयक्तिक भांडण नाही. मी काय त्यांच्यावर रोल फेकतो. तू कुणाची लायकी काढतोस? तू स्वतः काय आहेस? मी बॅग घेऊन घराबाहेर काढेन तुला” अशा शब्दात महेश मांजरेकर किरण मानेंना झापताना दिसत आहेत.

आणखी वाचा : “तू खोटारडा आहेस…” वीणा जगतापचे शिव ठाकरेबद्दल स्पष्ट वक्तव्य

याआधीही महेश मांजरेकरांनी किरण माने यांची कानउघडणी केली होती. ते विकास सावंतला आपल्या तालावर नाचवत आहेत, असे त्यांनी स्पष्ट मत मांडले होते. तसेच इतरांशी बोलताना थोडं अदबीने बोलायचे, अशी ताकीद दिली होती. मात्र या आठवड्यात देखील त्यांनी चुकीचं वर्तन केल्याने मांजरेकर त्यांची चावडीवर चांगलीच शाळा घेताना दिसत आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 mahesh manjrekar slams kiran mane for the rude behavior nrp