छोट्या पडद्यावरील सर्वाधिक चर्चेत असलेला कार्यक्रम म्हणून बिग बॉस मराठीकडे पाहिले जाते. सध्या या कार्यक्रमाची रंगत दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या स्पर्धकांमध्ये अनेक राडे, भांडण, सतत होणारे वाद पाहायला मिळत आहे. बिग बॉसच्या घरातून निखिल राजेशिर्के, मेघा घाडगे, योगेश जाधव आणि त्रिशूल मराठे हे चार जण आतापर्यंत घराबाहेर पडले आहेत. अभिनेत्री मेघा घाडगे हिने घराबाहेर पडल्यानंतर तिने योगेश जाधववर अनेक आरोप केले आहेत. त्यानंतर योगेश जाधवने ते आरोप फेटाळून लावले होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

“योगेशचा पहिल्या दिवसापासून त्याच्या तोंडावर अजिबात ताबा नाही. मी त्याला वेळोवेळी सावध केलं आहे. तू जे बोलतोस ते सगळंच मी ऐकून घेऊ शकत नाही. तू थोडं तोंड साभाळून बोलत जा, असे मेघा घाडगेने म्हटले होते. त्यानंतर योगेश जाधवने मेघा घाडगेचे हे सर्व आरोप खोडून काढले आहेत. “मी असं काहीही बोललेलो नाही. हा एक मोठा गैरसमज होता. मी एक दोन दिवसात तिला भेटेन असे त्याने यावेळी म्हटले होते. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या आठवड्याभरातच मेघा घाडगे आणि योगेश जाधव यांची एकमेकांशी भेट झाली आहे. याचे फोटोही व्हायरल झाले. मात्र यानंतर मेघा घाडगेला अनेक नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. मात्र नुकतंच तिने यावर सडेतोड उत्तर दिले आहे.
आणखी वाचा : “मी यापुढे पायाखालून कमरेपर्यंत साडी वर करेन आणि…” गौतमी पाटीलच्या लावणीवर मेघा घाडगे संतापली

मेघा घाडगेच्या पोस्टवर एका नेटकऱ्याने ही रिअॅलिटी असेल तर बाहेर आल्यावर योगेशवर घाणेरडे आरोप का केलेस? असा प्रश्न विचारला आहे. त्यावर तिने स्पष्ट शब्दात उत्तर दिले आहे. “आरोप??? जे घडलं ते सांगितलं. एक बाजूच ऐकलीत ना मग दुसरी बाजू कोण ऐकणार ??? बाहेर मी एकटी दिसले योगेशने मान्य केलं भेटल्यावर चुकीचं दाखवलं म्हणून. सत्य स्वीकारायला ही शिकायला हवं. बदनाम करायला एक क्षण ही लागत नाही पण सत्य स्वीकारायला वेळ लागतो. आणि त्यासाठी हिंमत हवी. आम्ही भांडणानंतर असेच होतो दोघे. जे तुम्हाला दाखवलं नाही”, असे मेघा घाडगे म्हणाली.

त्यावर त्या ट्रोलर्सने पुन्हा कमेंट केली आहे. “तुझं 100% टक्के बरोबर आहे, योगेश बोलला ते दाखवलं नाही जर तो असं बोलला असेल तर तू त्याला चांगलाच फैलावर घ्यायला पाहिजे. तू बिग बॉस मध्ये उत्तम खेळलीस त्याबद्दल अभिनंदन आणि आम्हाला तुझा अभिमान आहे”, अशी कमेंट त्या युजर्सने केली आहे.

त्यावर मेघा घाडगे प्रत्युत्तर दिले आहे. “धन्यवाद तू मला चांगलंच ओळखतॊस. त्यांनी माफी त्याच दिवशी मागितली. आणि माफ ही केलं पण ते बाहेर नाही दाखवलं. स्पर्धा आहे ती स्पर्धेनंतर आपण एक माणूस ही असतो. विसरून पुन्हा नव्याने नव्या स्पर्धेला समोर जावं लागत. तोच माणूस पुन्हा आपल्या समोर येईलच असं नाही”, असा शब्दात मेघा घाडगेने याला उत्तर दिले आहे.

यानंतर आणखी एका युजर्सने तिला पैशांबद्दल प्रश्न विचारला होता. “हो तुम्हीच तर दिले होते. आत्ता ते ही सांगा किती ते आणि मला खोटं ठरवायचे किती पैसे घेतलेत तुम्ही?” अशी कमेंट मेघा घाडगेने केली आहे.

आणखी वाचा : केक, गप्पा अन् सेलिब्रेशन; मेघा घाडगे-योगेश जाधवमधील रुसवे-फुगवे मिटले

दरम्यान मेघा घाडगेने काल दुपारच्या सुमारास एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टमध्ये तिने तिचे आणि योगेशचे काही फोटो शेअर केले होते. या फोटोत योगेश जाधव आणि तिच्यातील रुसवे-फुगवे मिटल्याचे पाहायला मिळत आहे. यात ते दोघेही एकत्र केक कापताना आणि सेलिब्रेशन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे एका फोटोत ते दोघेही गप्पा मारताना, हसतानाही दिसत आहे. या फोटोला हे सत्य आहे असे कॅप्शन तिने दिले आहे. त्यावर अनेकांनी कमेंट केले आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bigg boss marathi 4 megha ghadge reply to trollers after share photos with yogesh jadhav nrp