Bigg Boss Marathi Season 5 : ‘बिग बॉस मराठी’चा पाचवा सीझन सध्या प्रचंड चर्चेत आहे. नुकतीच घरात पत्रकार परिषद देखील पार पडली आहे. यंदा २८ जुलैला हा शो प्रेक्षकांच्या भेटीला आला. पहिल्या दिवसांपासून ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या सीझनला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळत आहे. यावर्षी एकूण १६ स्पर्धकांनी घरात प्रवेश घेतला होता. याशिवाय यंदा पहिल्यांदाच अभिनेता रितेश देशमुखने होस्टिंगची जबाबदारी सांभाळली होती. गेल्या दोन महिन्यांपासून चर्चेत असणाऱ्या या शोबद्दल तुम्हाला किती माहिती आहे?
‘बिग बॉस मराठी’ सीझन ५ संदर्भातील क्विझ
‘बिग बॉस मराठी’च्या ( Bigg Boss Marathi ) पाचव्या सीझनच्या चाहत्यांसाठी खास एक क्विझ तयार करण्यात आलेलं आहे. या क्विझमध्ये शोसंदर्भात व यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांसंदर्भातील एकूण १० प्रश्न आहेत. तुम्ही सुद्धा यंदाच्या सीझनचे चाहते असाल तर, या दहा प्रश्नांची अचूक उत्तरं द्या.
आजवर बिग बॉसचे ( Bigg Boss Marathi ) एकूण चार सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. तर, यंदाचं हे पाचवं पर्व आहे. आता या पर्वात कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. ‘बिग बॉस मराठी ५’ या शोसंदर्भात या क्विझमध्ये एकूण दहा प्रश्न आहेत. या १० प्रश्नांची अचूक उत्तरं द्या. तसेच तुम्हाला आवडल्यास तुमच्या इतर सहकाऱ्यांनाही पाठवा!
© IE Online Media Services (P) Ltd