‘कौन बनेगा करोडपती’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेली अनेक वर्ष हा कार्यक्रम प्रेक्षकांचं मनोरंजन करत आला आहे. तर आता या कार्यक्रमाचा पंधरावा सीझन सुरू आहे. या कार्यक्रमाच्या नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये एका स्पर्धकाला १ कोटींसाठी हिरोशिमावर झालेल्या अणुबॉम्ब हल्ल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. परंतु त्याचं उत्तर त्याला देता आलं नाही.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा : Video: “तू खोटारडी…”; अमिताभ बच्चन यांनी काजोलबद्दल केलेलं वक्तव्य चर्चेत

नुकत्याच झालेल्या एपिसोडमध्ये शुभम हॉट सीटवर बसले होते. त्यांनी ५० लाख रुपये जिंकले. पण त्यानंतर एक कोटींचा प्रश्न आल्यावर मात्र ते गोंधळले आणि त्यांना हा खेळ अर्धवट सोडून द्यावा लागला.

हेही वाचा : ‘KBC’मध्ये स्पर्धकाला २५ लाखांसाठी विचारला गेला ‘जंगल बुक’वर आधारित ‘हा’ प्रश्न, लाईफलाईन वापरूनही आलं नाही उत्तर, अखेर सोडावा लागला शो

एक कोटींसाठी त्यांना “६ ऑगस्ट १९४५ रोजी हिरोशिमावर पहिला अणुबॉम्ब टाकणाऱ्या विमानाचे नाव कोणावर आधारित होते?” असा प्रश्न विचारण्यात आला. त्याला A. एक पौराणिक शस्त्र, B एक चित्रपटामधील पात्र, C पायलटची आई, D ज्या ठिकाणी ते तयार केले गेले होते, असे चार पर्याय होते. अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारल्यानंतर शुभम यांनी प्रश्न वारंवार वाचायला सुरुवात केली. पण त्यांच्याकडे कोणतीही लाइफलाइनही शिल्लक नव्हती. त्यामुळे त्यांनी कार्यक्रम सोडण्याचा निर्णय घेतला. पण जाताना त्यांनी पन्नास लाख इतकी रक्कम जिंकली.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Competitor could not answer the question in karun banega crorepati know about it rnv