‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. ‘बिग बॉस’च्या यंदाच्या पर्वाच्या ट्रॉफीसाठी मराठमोळा शिव ठाकरे दावेदार मानला गेला होता. रॅपर एमसी स्टॅन व शिव ठाकरे यांच्यात ‘बिग बॉस’च्या ट्रॉफीसाठी चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. परंतु, स्टॅनने बाजी मारल्यामुळे शिव फर्स्ट रनर अप ठरला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मराठमोळ्या शिवचा चाहता वर्ग प्रचंड मोठा आहे. ‘बिग बॉस’नंतर अमरावतीत चाहत्यांकडून त्याचं जंगी स्वागत करण्यात आलं. त्यानंतर तो मुंबईत परतला. नुकतेच त्याने एक इन्स्टाग्राम लाईव्ह सेशन घेतले ज्यात त्याने त्याच्या चाहत्यांचे आभार मानले आहेत तसेच त्यांच्याशी संवाददेखील साधला आहे. शिवच्या एका चाहतीने त्याच्याकडे एक विचित्र मागणी केली. जी ऐकल्यावर तोदेखील गडबडला.

या सेशन दरम्यान एका चाहतीने त्याला प्रश्न विचारला की “मला बॉयफ्रेंड मिळवून दे” अशी मागणी करताच शिवदेखील लाजला आणि त्याला यावर काय बोलावे सुचेनासे झाले. तो म्हणाला मी हे नाही करू शकत. या सेशनमध्ये त्याने चाहत्यांच्याबरोबरीने ज्या कलाकारांनी त्याने पाठिंबा दिला त्यांचे ही आभार मानले.

शिव ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या पर्वातही सहभागी झाला होता. या पर्वाचा तो विजेताही ठरला होता. त्यामुळे ‘बिग बॉस हिंदी’च्या सोळाव्या पर्वाची ट्रॉफीही शिव नावावर करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, एमसी स्टॅनला सर्वाधिक मतं मिळाल्यामुळे शिवला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Girl fans demanding shiv thackarey to get her boyfrined during instagram live session spg