बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाचे आजही लाखो चाहते आहेत. अमिताभ बच्चन यांनी एकेकाळी बॉलिवूड गाजवलं होतं. त्यांच्या करिअरबरोबरच अनेकदा त्यांचं खासगी आयुष्यही चर्चेत राहिलं होतं. पडद्यावर आपल्या भूमिकेमुळे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारे बिग बी स्वयंपाकात मात्र चांगलेच कच्चे आहेत. सध्या त्यांचा एका नवा प्रोमो व्हायरल होत आहे.

केबीसी कार्यक्रमात स्पर्धकांच्या बरोबरीने कधी कधी कलाकार हजेरी लावत असतात. नुकतीच या कार्यक्रमात विकी कौशल कियारा अडवाणी या कार्यक्रमात आले होते. तेव्हा बच्चन यांनी दोघांना विचारले की “तुम्हाला जेवण बनवता येत का?” त्यावर कियारा म्हणाली “हो येत कधी कधी बनवते” तर विकीने उत्तर दिले की “सर मला फक्त चहा येतो करता,” हे ऐकताच सगळेच जण हसायला लागले. यावर अमिताभ बच्चन म्हणाले, “आपल्या दोघांची परिस्थतीसारखीच, विकी तुला तेवढं तरी येत मला फक्त पाणी गरम करता येत, मी एकदा परदेशात गेलो होतो तेव्हा एकटा राहत होतो तेव्हा मला ८ दिवसांनी कळले अंड कुठून फोडायचे ते,” बच्चनजींनचा हा किस्सा ऐकताच सर्वचजण हसायला लागले.

दरम्यान विकी कौशल, कियारा अडवाणी, भूमी पेडणेकर यांचा ‘गोविंदा नाम मेरा’ हा चित्रपट आता डिस्ने हॉटस्टारवर नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करण्यात आले होते. प्रदर्शित होऊन अवघ्या काही दिवसातच हा चित्रपट ओटीटी माध्यमावर सुपरहिट ठरला आहे.