काही महिन्यांपूर्वी ‘झी मराठी’वर ‘सारं काही तिच्यासाठी’ ही मालिका सुरू झाली. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मनं जिंकली. दुरावलेल्या नात्यांना पुन्हा जवळ आणण्यासाठी उमाने उचललेले पाऊल म्हणजे “सारं काही तिच्यासाठी”. ह्या मालिकेत रोज नवीन ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. मग ते ओवी आणि श्रीनिवासमधली नोकझोक असूदे किंवा निशी आणि ओवीमध्ये बहिणींचं खुलणारं नातं असुदे, ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असल्याचं दिसून येत आहे. आता ह्या मालिकेत आणखी एक मोठा ट्विस्ट येणार आहे.

आणखी वाचा : Video: ऋतुजा बागवेने केलं भगरे गुरुजींच्या लेकीने सुरु केलेल्या ‘वदनी कवळ’ हॉटेलमध्ये जेवण, म्हणाली, “ॲम्बिअस आणि जेवणाची चव…”

‘सारं काही तिच्यासाठी’ ह्या मालिकेत या आठवड्याच्या येत्या भागात प्रेक्षकांना पाहायला मिळेल निशीला बॅडमिंटनच्या स्पर्धेत भाग घ्यायची संधी चालून येते, पण रघुनाथ खोत ह्यांच्या तत्वात ते बसत नाही. वडिलांची जरब असल्यामुळे निशी छायाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करते व मनाविरुद्ध जाऊन स्पर्धेत भाग न घेण्याचे ठरवते. ओवीला निशीच्या बॅडमिंटन प्रेमाबद्दल कळतं आणि ती निशाला प्रोत्सहान द्यायचं ठरवते आणि स्पर्धेत भाग घ्यायला लावते.

हेही वाचा : Video: “तुम्ही मुलाच्या आयुष्याचं वाटोळं करताय…”, नातेवाईकांनी स्वप्नील जोशीच्या आई-वडिलांना सुनावलं, आठवण सांगत अभिनेता म्हणाला…

त्यामुळे ह्या दसऱ्याच्या मुहूर्तावर निशी सीमोल्लंघन कारणार आहे. आता त्यावर दादा खोतांची प्रतिकिया काय असणार? आणि उमा निशीच्या पाठीशी उभी राहणार का? ह्या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी पाहायला विसरू नका ‘सारं काही तिच्यासाठी’ सोमवार ते शुक्रवार संध्या ७ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.