Malti Chahar Sad After Pranit More Exit : ‘बिग बॉस १९’ सुरू होऊन आता ७० दिवस पूर्ण झाले आहेत. या ७० दिवसांच्या प्रवासात ‘बिग बॉस’च्या घरातील काही स्पर्धकांचा प्रवास संपला आहे. अशातच शोमधून नुकतीच प्रणित मोरेची एक्झिट झाली. अर्थात, प्रणित कमी वोट्समुळे नाही तर आजारपणामुळे बाहेर पडला आहे.
गेल्या आठवड्यात त्याच्या एविक्शनसंबंधित अनेक वृत्त समोर आले होते. पण, याचं कारण रविवारच्या ‘वीकेंड का वार’मध्ये समोर आलं. प्रणितला डेंग्यूचं निदान झालं आणि घरात त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला घराबाहेर जावं लागलं. याबद्दल नुकतीच प्रणितच्या टीमनंही माहिती दिली.
प्रणित बाहेर पडल्यानं घरातील सर्वांनाच दु:ख झालं, पण जास्त दु:ख झालं ते मालती चहरला. प्रणित घराबाहेर पडल्यानंतर तिला एकटं एकटं वाटत आहे. नीलमशी बोलताना तिनं ‘या घरात तो एकच माझा चांगला मित्र होता’ अशा भावना व्यक्त केल्या.
नीलम आणि मालती एकत्र बसलेले असताना नीलम मालतीला म्हणाली, “मला ही गोष्ट पचतच नाहीय की प्रणित या घरातून गेलाय.” त्यावर मालतीही काहीशी भावुक स्वरात “माझा तर या घरातला तो एकमेव मित्र होता आणि तोसुद्धा निघून गेला,” असे म्हणते.
प्रणित बाहेर जाताना मालतीनं प्रणितला घट्ट मिठी मारली. तसंच तिनं त्याला काळजी घेण्यासही सांगितलं. तसंच त्याच्या जाण्यानं मालतीला एकटं एकटं वाटत आहे. ती निराश बसलेली पाहायला मिळाली. तिला उदास झालेलं पाहून तान्या “काय झालंय?” असंही विचारलं. ज्यावर मालती तिला उत्तर देत म्हणाली की, “प्रणित बाहेर गेलाय याचं वाईट वाटतंय.”
प्रणित मोरे इन्स्टाग्राम पोस्ट
प्रणितच्या जाण्यानं मालती नव्हे तर अभिषेक, अशनूर, मृदुल आणि गौरव यांनाही दुःख झालं आहे. प्रणित जाताच कुनिका म्हणाल्या, “त्यानं आपल्या सगळ्यांच्या चुकांची शिक्षा भोगली आहे, तो या घरातून बाहेर जाण्यासाठी अजिबातच पात्र नव्हता. खूप चांगला मुलगा होता.” त्यावर नीलमही म्हणाली, “हो… खूपच चांगला मुलगा होता, नुकताच घराचा कॅप्टनही बनला होता.” त्यानंतर गौरव खन्नाही भावुक झाला. मृदुलशी बोलताना तो त्याला म्हणाला, “माझे या घरात दोनच चांगले मित्र होते, एक तू आणि दुसरा तो… पण आता तोही गेला.”
दरम्यान, ‘बिग बॉस’च्या घरात मालती आणि प्रणित यांची चांगलीच मैत्री झाली होती. दोघांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडत होती. मात्र आता मैत्रीत काहीसा दुरावा आला आणि याचं कारण प्रणितची ‘बिग बॉस’च्या घरातून अचानक झालेली एक्झिट. दरम्यान, आता प्रणित बरा झाल्यानंतर पुन्हा शोमध्ये येणार का? याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
