Marathi Actor Santosh Nalawade Passed Away: मराठी सिनेविश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. अनेक मराठी मालिकांमध्ये विविधांगी भूमिका साकारणारे संतोष नलावडे यांचे निधन झाले आहे. एका अपघातात जखमी झाल्यावर संतोष यांची उपचारादरम्यान प्राणज्योत मालवली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४९ वर्षीय संतोष नलावडे ‘लाखात एक आमचा दादा’, ‘अप्पी आमची कलेक्टर’ यासारख्या प्रसिद्ध मालिकांचा भाग होते. नांदेड येथे झालेल्या रस्ते अपघातात संतोष नलावडे यांचे निधन झाले.

नांदेडला गेले होते संतोष नलावडे

संतोष नलावडे हे महसूल क्रीडा स्पर्धेसाठी नांदेड येथे गेले होते. तिथेच त्यांचा अपघात झाला, त्यांना गंभीर अवस्थेत उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान सोमवारी (२४ फेब्रुवारी) त्यांची प्राणज्योत मालवली.

संतोष नलावडे

मिळालेल्या माहितीनुसार, संतोष नलावडे हे सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील एका विभागात कार्यरत होते. अभिनयाची आवड असल्याने नोकरी करतानाच त्यांनी अभिनय करण्यासही सुरुवात केली. ‘अप्पी आमची कलेक्टर’, ‘मन झालं बाजींद’, ‘कॉन्स्टेबल मंजू’, ‘लागीर झालं जी’, ‘लाखात एक आमचा दादा’ यासारख्या मालिकांमध्ये संतोष नलावडे यांनी काम केलं होतं.

संतोष नलावडे हे मूळचे साताऱ्याचे होते. निधनानंतर त्यांचे पार्थिव मूळ गावी नेण्यात आले व तिथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या निधनामुळे मराठी मालिकाविश्वावर शोककळा पसरली आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actor santosh nalawade died in road accident hrc