मराठीमधील टॉपच्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये अभिनेत्री प्रार्थना बेहरेचं नाव आवर्जुन घेतलं जातं. मराठी चित्रपटांमध्ये तिने उत्तमोत्तम काम करत कलाक्षेत्रामध्ये स्वतःचं एक वेगळं स्थान निर्माण केलं. ‘पवित्र रिश्ता’ ही हिंदी मालिका तिच्यासाठी लकी ठरली. त्यानंतर मराठी मालिकांमध्ये तिने केलेलं काम प्रेक्षकांना कायमचं लक्षात राहणारं आहे. सध्या ती झी मराठी वाहिनीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेमुळे चर्चेत आहे. पण तुम्हाला माहित आहे का? प्रार्थनाने पत्रकारितेचं शिक्षण घेतलं आहे. अभिनयक्षेत्रात पदार्पण करण्यापूर्वी ती पत्रकार म्हणून काम करत होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आणखी वाचा – Video : प्रार्थना बेहरे व श्रेयस तळपदेचा रोमान्स, ‘तो’ व्हिडीओ पाहून अभिनेत्रीच्या नवऱ्याने केलेली कमेंट चर्चेत

झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ कार्यक्रमामध्ये प्रार्थनाने हजेरी लावली होती. यावेळी तिने या गोष्टीबाबत खुलासा केला. पत्रकारितेमध्ये काम करत असताना बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांची मुलाखत घेण्याची संधी तिला मिळाली. पण पत्रकारिका या क्षेत्रामध्ये प्रार्थना नवी असताना तिने थेट एका कार्यक्रमादरम्यान बिग बी अमिताभ बच्चन यांना प्रश्न विचारला होता. यावेळी उपस्थितांनीही तिच्याकडे आश्चर्याने पाहिलं होतं.

‘बस बाई बस’मध्ये कार्यक्रमाचा सुत्रसंचालक सुबोध भावेशी संवाद साधत असताना प्रार्थना म्हणाली, “अमिताभ बच्चन यांचा ‘निशब्द’ नावाचा चित्रपट तेव्हा प्रदर्शनाच्या मार्गावर होता. या चित्रपटाच्या पत्रकार परिषदेला मी गेले होते. पत्रकार म्हणून मलाही अमिताभ यांना प्रश्न विचारायचा होता. म्हणून मी हात वर केला. मी अगदी शेवटी बसली होती. मंचावर उपस्थित असलेल्या सुत्रसंचालकाची माझ्यावर नजर गेली आणि त्यांनी मला प्रश्न विचारण्यास सांगितला.”

आणखी वाचा – “मासिक पाळीत होणारा रक्तस्राव मी लाडूमध्ये…” ‘त्या’ आरोपांबाबत कंगना रणौत स्पष्टच बोलली, काळ्या जादूबाबतही केलं भाष्य

“६० वर्षीय असलेली व्यक्ती वय वर्ष १६ असलेल्या मुलीच्या प्रेमात पडते अशीच काहीशी या चित्रपटाची कथा होती. यावरूनच मी त्यांना विचारलं की, असं म्हटलं जातं की वयाच्या साठीनंतर माणूस विचित्र वागू लागतो. या चित्रपटामध्ये वय वर्ष साठ असताना तुम्ही १६ वर्षीय मुलीवर प्रेम केलं आहे ते तुमच्या विचित्रपणामुळे केलं आहे का? असा प्रश्न विचारणं माझी चुकी होती. पण मी तो त्यांना नव्हे तर चित्रपटामधील त्यांच्या भूमिकेसाठी विचारला होता.” या प्रश्नानंतर अमिताभ प्रार्थनाला म्हणाले की, “ते तुम्हाला चित्रपट पाहिल्यानंतर कळेल.” प्रार्थनाने प्रश्न विचारताच मात्र उपस्थित तिच्याकडेच पाहत होते. पण पत्रकार परिषद संपली आणि पत्रकार परिषदेला उपस्थित मंडळींनी प्रार्थनाला चांगलंच धारेवर धरलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress ask question to bollywood actor amitabh bachchan know about details kmd