मराठी विश्वातील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री म्हणून प्रार्थना बेहरेला ओळखले जाते. अनेक मालिका आणि चित्रपटांमुळे ती घराघरात पोहोचली. त्यानंतर आता ती माझी तुझी रेशीमगाठ या मालिकेत प्रमुख भूमिकेत दिसत आहे. तिच्या या भूमिकेला आणि मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहे. प्रार्थना बेहरेच्या लग्नाला बराच काळ लोटला आहे. अनेकदा तिला तू आई कधी होणार असा प्रश्न विचारत असतात. यावरुन अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. मात्र नुकतंच प्रार्थनाने या ट्रोलिंगवर भाष्य केले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर कायमच सक्रीय असते. ती नेहमी विविध पोस्ट शेअर करताना दिसते. नुकतंच प्रार्थना बेहरेने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक पोस्ट शेअर केली आहे. यात तिने आई होण्याच्या प्रश्नावर होत असलेल्या ट्रोलिंगबद्दल अप्रत्यक्षरित्या भाष्य केले. प्रार्थनाने तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीत एका रस्त्यावर बोर्डचा फोटो पोस्ट केला आहे.
आणखी वाचा : “अंकिताबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर सुशांत…” प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

“जेव्हा वयाच्या तिशीत तुम्हाला मुलं नसतात तेव्हा खरं तर तुम्ही २० वर्षीय असता. फक्त त्यावेळी तुमच्याकडे पैसे असतात”, असे त्यावर लिहिण्यात आले आहे. हा फोटो पोस्ट करत तिने हे अगदी खरंय असं म्हटलं आहे.

आणखी वाचा : “आमचं लग्न…” वैभव तत्ववादीबद्दल प्रार्थना बेहरे स्पष्टच बोलली

दरम्यान अभिनेत्री प्रार्थना बेहरे हिने २०१७ मध्ये दिग्दर्शक अभिषेक जावकरबरोबर लग्नगाठ बांधली. मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणून अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांना ओळखले जाते. प्रार्थना बेहरे आणि अभिषेक जावकर यांचा विवाह १४ नोव्हेंबर २०१७ रोजी झाला होता. अभिषेक जावकर हा लेखक, दिग्दर्शक, निर्माता आहे. अर्थशास्त्रात पदवीधर असलेल्या अभिषेकला परदेशात जाऊन एमबीए करण्याची इच्छा होती.

पण, कॉलेजच्या दिवसांमध्ये इव्हेंट मॅनेजमेन्टसाठी काम करणाऱ्या अभिषेकला त्याच्या मित्राने चित्रपट निर्मिती क्षेत्रात गुंतवले. मूळ ‘सिंघम’ चित्रपटाची निर्मितीही अभिषेकनेच केली आहे. ‘यमुदू’, ‘गोलिमार’ आणि तेलगूमध्ये डब केलेल्या ‘हॅरी पॉटर’ सीरिजचे वितरणही अभिषेकनेच केले.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress prarthana behere talk about motherhood with cryptic post nrp