marathi actress priya bapat shared her experience said i went for washroom during drama play in bus bai bus show | Loksatta

“नाटकाचा प्रयोग सुरू असताना लघुशंका आली अन्…”, प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा

प्रिया बापटने ‘बस बाई बस’ शोमध्ये हजेरी लावली.

“नाटकाचा प्रयोग सुरू असताना लघुशंका आली अन्…”, प्रिया बापटने सांगितला ‘तो’ किस्सा
‘बस बाई बस’ शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने हजेरी लावली.

झी मराठी वाहिनीवरील ‘बस बाई बस’ शो  प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. अभिनेता सुबोध भावे या शोचं सूत्रसंचालन करत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील कर्तृत्वान महिला या शोमध्ये सहभागी होतात. सुबोध भावे आणि इतर स्त्रिया मिळून मंचावरील महिलेला बोलतं करतात. या शोच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भागात मराठमोळी अभिनेत्री प्रिया बापट हिने हजेरी लावली.

उत्तम अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणाऱ्या प्रियाने निर्मिती क्षेत्रातही पाऊल ठेवलं आहे. प्रियाने तिच्या खुमासदार शैलीने विचारलेल्या प्रश्नांना मजेशीर उत्तरे देत कार्यक्रमात रंगत आणली. अनेक किस्से शेअर करत प्रियाने कार्यक्रमात हशा पिकवला. मालिका, चित्रपट याबरोबरच प्रियाने नाटकांतही काम केलं आहे. कार्यक्रमात सुबोध भावेने प्रियाला तिच्या नाटकाबद्दल एक प्रश्न विचारला. यावेळी प्रियाने नाटकाचा प्रयोग सुरू असताना तिच्याबरोबर घडलेला किस्सा सांगितला.

हेही वाचा >> Video : ‘ब्रह्मास्र’मधील ‘केसरिया’ गाणं पुन्हा होणार प्रदर्शित, अयान मुखर्जीने शेअर केला खास व्हिडीओ

हेही वाचा >> “लग्न करायचे म्हणून तो रोज माझ्या घरी…”, रिंकूने सांगितला ‘त्या’ चाहत्याचा भयानक किस्सा

सुबोध भावेने प्रियाला “कलाकार कधी वाक्य विसरतात. कधी जास्तीची वाक्य घेतात, यामुळे बऱ्याचदा नाटक लांबतं. अडीच तासाचं नाटक कधीकधी तीन तासाचं होतं. पण याव्यतिरिक्तही काही कारणांमुळे नाटक लांबलेलं मी ऐकलं आहे. नेमंक काय घडलं होतं?”, असं विचारलं.

हेही पाहा >> Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवालीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक, कमेंट करत म्हणाले “बॉलिवूडमध्ये एन्ट्री…”

सुबोध भावेने विचारलेला प्रश्न ऐकताच प्रियाला तिच्याबरोबर घडलेला किस्सा आठवला. किस्सा शेअर करत ती म्हणाली, “उमेश कामत, मी आणि हेमंत ढोमे ’नवा गडी नवं राज्य’ हे नाटक करायचो. पुण्यातील एका प्रयोगाला हा किस्सा घडलेला आहे. नाटकात एका सीनमध्ये मी रंगमंचावरून बाहेर गेल्यावर हेमंत-उमेशचं संभाषण सुरू असतं आणि त्यांच्या काही वाक्यानंतर माझी पुन्हा एन्ट्री होते. प्रयोग सुरू असताना नाटकातील त्या सीनला मी विंगेत(रंगमंचाबाहेर) गेले आणि माझ्या लक्षात आलं की मला लघुशंका आली आहे. पुढे मला संपूर्ण नाटक करायचं होतं. त्यामुळे मी विंगेतून हेंमत आणि उमेशला खुणावून सांगितलं की तुम्ही संभाषण चालू ठेवा. मी पटकन जाऊन येते”.

हेही वाचा >> “लोकलमध्ये मी नेलपेंट, लिपस्टिक विकायचे अन्…”, विशाखा सुभेदारने शेअर केल्या खडतर प्रवासातील आठवणी

“हेंमत आणि उमेशने मी येईपर्यंत संभाषण सुरू ठेवलं होतं. मी पटकन धावत गेले आणि आल्यानंतर त्यांना विंगेतून खुणावलं. मी आले आहे. आता तुम्ही शेवटचं वाक्य घ्या. म्हणजे मला पुन्हा रंगमंचावर एन्ट्री घेता येईल”, प्रियाने हा किस्सा सांगताच सुबोध भावेलाही हसू आवरलं नाही. तो पुढे म्हणाला, “बरेचसे कलाकार असे असतात जे नाटकाची तिसरी घंटा व्हायची आधी बाथरूमजवळ सापडतात. नाटक सुरू व्हायच्या आधी त्यांना प्रेशर आलेलं असतं. पण यावरूनच कलाकारांची त्यांच्या कामावर, नाटकावर असलेली श्रद्धा दिसून येते”.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
‘ये रिश्ता…’मधील अभिनेत्रीची प्रकृती ढासळली; रुग्णालयात दाखल मैत्रिणीला भेटण्यासाठी पोहोचली तारक मेहता फेम सोनू

संबंधित बातम्या

Video : दोघंही एकाच बेडवर, किस केलं अन्…; स्वप्निल जोशी व शिल्पा तुळसकरचा ‘तो’ इंटिमेट सीन व्हायरल
Bigg Boss 16 : ‘बिग बॉस १६’मध्ये लवकरच गोल्डन बॉयची एन्ट्री होणार, व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण
Video : “तुझा एक हात तुटला आहे आता दुसराही…” पहिल्याच दिवशी राखी सावंत व तेजस्विनीमध्ये जोरदार भांडण
‘फुलाला…’ मालिकेचा सुगंध सदैव दरवळत राहणार; लोकाग्रहास्तव वाहिनीचा मोठा निर्णय
“गावातले लोक येतात म्हणूनच शिव ठाकरे…” अर्चना गौतमचं ‘बिग बॉस मराठी’बद्दल वादग्रस्त विधान

व्हिडिओ

ताज्या बातम्या
IFFI च्या ज्युरी प्रमुखांनी ‘द कश्मीर फाइल्स’ चित्रपटाला म्हटलं ‘वल्गर’ आणि ‘प्रोपगंडा’; अनुपम खेर यांनी दिलं उत्तर, म्हणाले “असत्याची…”
अ‍ॅपलकडून ट्विटर अ‍ॅप हटवण्याची धमकी, एलॉन मस्क यांचा गंभीर आरोप
Viral Video: शिक्षकाने भरवर्गात मुस्लीम विद्यार्थ्याला ‘दहशतवादी’ म्हणून मारली हाक, विद्यार्थी संतापताच म्हणाले “मी तर…”
विश्लेषण: कापसाला गेल्‍या वर्षीइतके दर मिळतील का?
“चीनप्रमाणे मुंबई-महाराष्ट्रातही…”; करोनादरम्यान राज्यात ‘ठाकरे सरकार’ सत्तेवर असल्याची आठवण करुन देत सेनेचा शिंदे गट, भाजपावर हल्लाबोल