बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट मुख्य भूमिकेत असलेला ‘ब्रह्मास्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला सर्वत्र प्रदर्शित झाला. ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासूनच हा चित्रपट बॉयकॉट ट्रेण्डमध्ये अडकला होता. चित्रपटातील ‘केसरिया’ हे गाणंही ट्रोल करण्यात आलं होतं. या गाण्याचे बोल नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरले नसल्यामुळे गाण्यावरील अनेक मीम्सही व्हायरल झाले होते. आता हे गाणं पुन्हा प्रदर्शित करणार असल्याचं दिग्दर्शक अयान मुखर्जीने सांगितलं आहे.

अयान मुखर्जीने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ही माहिती दिली आहे. ‘केसरिया’ हे गाणं पुन्हा चित्रीत करण्यात आलं होतं. आधी चित्रीत करण्यात आलेल्या ‘केसरिया’ गाण्याच्या व्हर्जनचा व्हिडीओ अयान मुखर्जीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करत पोस्ट लिहली आहे. “ब्रह्मास्र चित्रपटातील ‘केसरिया’ गाण्याला आपण सगळ्यांनीच भरभरून प्रेम दिलं आहे. परंतु, हे चित्रपटातील हे गाणं दोनदा चित्रीत करण्यात आलं आहे. यापूर्वी हे गाणं असं चित्रित करण्यात आलं होतं. या गाण्याच्या तालावर ठेका धरण्याचा मोह आवरता येत नाही”, असं त्याने पोस्टमध्ये म्हटलं आहे.

crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट
once man misbehaved with priya bapat (1)
प्रिया बापटबरोबर दादरमध्ये एका माणसाने केलं होतं गैरवर्तन, धक्कादायक प्रसंग सांगत म्हणाली, “त्याने माझे स्तन…”
sanjay-leela-bhansali-priyanka-chopra
नऊ वर्षांनी प्रियांका चोप्रा झळकणार संजय लीला भन्साळी यांच्या चित्रपटात; देसी गर्ल लवकरच करणार घोषणा

हेही वाचा >> Big Boss Marathi : “अशी सोन्यासारखी संधी…”, ‘बिग बॉस’मध्ये सहभागी होण्याबाबत गुलाबराव पाटलांनी केलेलं वक्तव्य चर्चेत

पुढे त्याने “परंतु, हे गाणं ऐकल्यावर चित्रपटात रोमॅंटिक गाण्याची अधिक आवश्यकता असल्याचं मला जाणवलं. त्यामुळे मी संपूर्ण टीमला हे गाणं पुन्हा चित्रीत करण्याची विनंती केली आणि सगळ्यांनी ते मान्यही केलं. त्यामुळे आता चित्रपटात दाखवण्यात आलेलं केसरिया हे गाणं चित्रीत केलं गेलं. पण, हे आधी चित्रीत केलं गेलेलं गाणं कोणालाही न दाखवण्याचा विचार मी केला होता”, असं म्हटलं आहे.

हेही वाचा >> महेश बाबूवर दु:खाचा डोंगर कोसळला असताना घरात चोरीचा प्रयत्न, चोराने भिंतीवरून उडी मारली अन्…

हेही पाहा >> Photos : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवालीचा ग्लॅमरस लूक पाहून चाहते अवाक, कमेंट करत म्हणाले “बॉलिवूडमध्ये एन्ट्री…”

“परंतु आता चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. आधी चित्रित करण्यात आलेलं केसरिया हे गाणं चित्रपटासाठी योग्य नसलं तरीही त्यात मजा आहे. त्यामुळे हे गाणं आम्ही पुन्हा प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. या आठवड्याच्या वीकेंडला ‘केसरिया-डान्स मिक्स’ व्हर्जन आम्ही प्रदर्शित करत आहोत”, असं म्हणत अयान मुखर्जीने पोस्ट शेअर केली आहे. ‘ब्रह्मास्र’ चित्रपटातील केसरिया गाणं ट्रोल करण्यात आलं होतं. आता हे ‘डान्स मिक्स’ व्हर्जन प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी अपेक्षा त्याने व्यक्त केली आहे.