अभिनयाबरोबर निर्मितीची धुरा सांभाळणारी श्वेता शिंदे हिच्या घरावर मोठा दरोडा पडल्याचं समोर येत आहे. घटनेच्या वेळी घरात कोणी नसल्यामुळे अभिनेत्रीचं कुटुंब सुखरुप आहे. याप्रकरणी श्वेताने एफआयआर दाखल केला असून पोलीस लवकरच चोरांना शोधून काढतील, असा विश्वात तिनं व्यक्त केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अभिनेत्री श्वेता शिंदे आपल्या कुटुंबासह साताऱ्यातील पिरवाडी येथे राहते. याच साताऱ्याच्या घरात ३ जूनला चोरांनी मोठा दरोडा टाकला. यावेळी घरात कोणीच नव्हतं. श्वेता देखील कामानिमित्ताने मुंबईत होती. पण चोर हिच वेळ साधत अभिनेत्रीच्या घरात घुसले. त्यांनी कपाटातले दागिने आणि पैशांची चोरी केली. त्यामुळे अभिनेत्रीच्या घराच्या आजूबाजूला खळबळ माजली. आता याप्रकरणी सातारा पोलिसांचा तपास सुरू आहे.

हेही वाचा – Video: “प्रिय आई…”, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम पृथ्वीक प्रतापने आईला दिलं वाढदिवसाचं सरप्राइज, लिहिली खास पोस्ट

सातारा पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर श्वेता शिंदेने माध्यमांशी संवाद साधला. यावेळी अभिनेत्री म्हणाली, “सोमवारी, ३ तारखेला रात्री माझ्या सातारच्या घरात दरोडा पडला. त्यासाठी मी तक्रार करायला आली आहे. १० तोळं सोनं आणि पैसे चोरीला गेले आहेत. पण एकूण किती मालमत्ता चोरीला गेलीये हे माहित नाहीये. आईच्या जेवढं लक्षात आहे, तेवढं तिनं सांगितलंय. नशीब चोरी झाली त्यावेळी ती घरात नव्हती. त्यामुळे तिला कुठलीही दुखापत झाली नाहीये. आता मी पोलीस अधिकाऱ्यांना भेटले आहे. इथली पोलीस यंत्रणा सशक्त आहे. त्यामुळे याप्रकरणातील गुन्हेगार लवकरच पकडले जातील, अशी माझी सकारात्मक भावना आहे.”

हेही वाचा – “महाराष्ट्रातल्या विजयात तुमचाही वाटा…”, उद्धव ठाकरेंचा किरण मानेंना फोन, अभिनेत्याच्या डोळ्यांत आले आनंदाश्रू

दरम्यान, श्वेता शिंदेच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर, तिनं बऱ्याच मालिका, चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पण सध्या अभिनयापासून दूर राहून श्वेता निर्मिती क्षेत्रात काम करत आहे. श्वेताची निर्मिती असलेली ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

हेही वाचा – “लाखो लोकांची दिशाभूल…”, अयोध्येतील निकालाबद्दलच्या ‘त्या’ पोस्टवरून भडकला सोनू निगम, म्हणाला…

लवकरच श्वेताची निर्मिती असलेली नवी मालिका ‘लाखात एक आमचा दादा’ ‘झी मराठी’वर सुरू होणार आहे. या मालिकेत अभिनेता नितीश चव्हाण व अभिनेत्री दिशा परदेशी प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress producer shweta shinde big theft took place in satara house pps