‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली समृद्धी केळकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. नेहमी सुंदर फोटो, व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतीच समृद्धीने हटके पोस्ट वडिलांच्या वाढदिवसानिमित्ताने लिहिली आहे. तिची ही पोस्ट सध्या चर्चेत आली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

समृद्धी केळकरने वडिलांबरोबर चहा पितानाचा फोटो शेअर करत लिहिलं, “बाबा…माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची, लाडकी, प्रेमळ, खंबीर व्यक्त . स्वप्न पूर्ण करताना आपली माणसं आपल्याबरोबर असली की आपला मार्ग सोपा होतो. आज मी जे काही आहे ते फक्त या व्यक्तीमुळे. आईनंतर दुःख बाजूला सारून खंबीरपणे आई आणि बाबा असं दोन्ही होऊन आम्हा मुलींना फार लाडात वाढवलं आणि आजही आमचं आणि नातवाचं तेवढंच सगळं प्रेमाने करतात.”

पुढे समृद्धीने लिहिलं, “कायम प्रोत्साहन देणारे, शूटिंगला जाताना डबा भरून देणारे, पोहोचलीस का जेवलीस? म्हणून सारखे फोन करणारे, वेळेप्रसंगी कठोर होणारे, चहा प्रेमी, माझा फसलेला पदार्थ तक्रार न करता मिटक्या मारत खाणारे, फोन कमी वापर म्हणून लेक्चर देणारे, कुठेही कधीही डुलकी काढण्याचं कौशल्य असणारे, दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा हास्यजत्रेची पारायणं करणारे, मी केलेल्या कामाचे भाग परत परत बघणारे, कौतुक करणारे असे हे माझे बाबा.”

“जगात मी कोणाला (आदरयुक्त) घाबरत असेन तर फक्त यांनाच…भांडणाशिवाय जीवनात गंमत नाही यावर आमचा ठाम विश्वास असल्याने आम्ही दररोज न चुकता भांडतो. मग कारण काहीही असो ते एका गरमागरम चहाच्या कपावर मिटतं… “मी तुला सोडायला येतो आणि आणायला येतो” संघटनेचे अध्यक्ष प्रमुख सुनिल केळकर (बाबा) यांना वाढदिवसाच्या ह्या तुमच्या लाडक्या शेंडेफळाकडून खूप खूप शुभेच्छा…असेच कायम आनंदी रहा… thank you for everything and love you alot टीप- ( टाएट करायच्या फंदात पडू नका…तुम्ही आम्हाला तुमच्या वाढलेल्या पोटासकट आवडता ),” अशी सुंदर पोस्ट लिहित समृद्धीने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

समृद्धी केळकरच्या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी तिच्या वडिलांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता पुष्कर जोग, गौरी नलावडे, केतकी विलास, सुयश टिळक, निखिल बने, वनिता खरात, अक्षय केळकर, पूर्वा कौशिक या कलाकारांच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. तसंच चाहत्यांनी समृद्धीच्या वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Marathi actress samruddhi kelkar shared special post for father on his birthday pps