‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’मधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेले प्रथमेश लघाटे आणि मुग्धा वैशंपायन यांनी संगीत क्षेत्रात त्यांची स्वतःची ओळख निर्माण केली आहे. काही दिवसांपूर्वीच प्रथमेश लघाटे आणि ती एकमेकांना डेट करत असल्याचा खुलासा त्यांनी केला आणि त्यांचं नातं सर्वांसमोर आणलं. त्यांच्या नात्याबद्दल कळल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांच्या या रिलेशनशिपबद्दल रोहित राऊत, आर्या आंबेकर आणि कार्तिकी गायकवाड यांना आधीपासून माहीत होतं का, याचं उत्तर प्रथमेश आणि मुग्धाने दिलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रथमेश लघाटे, मुग्धा वैशंपायन, आर्या आंबेकर, कार्तिकी गायकवाड आणि रोहित राऊत हे ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’च्या पहिल्या पर्वाचे टॉप ५ स्पर्धक होते. त्यांना सगळे ‘पंचरत्न’ म्हणून ओळखतात. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’नंतर या पाच जणांनी मिळून गाण्याचे अनेक कार्यक्रम एकत्र केले. तर दोन वर्षांपूर्वी त्यांनी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं परीक्षणही केलं. या पाच जणांची मैत्री खूप घट्ट आहे. त्यामुळे मुग्धा व प्रथमेशने त्यांच्या नात्याबद्दल जाहीर करण्याच्या आधीच रोहित, आर्या आंबेकर आणि कार्तिकीला माहीत होतं का याचा खुलासा त्यांनी केला आहे.

आणखी वाचा : मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटेचं शिक्षण किती? दोघांची शैक्षणिक पार्श्वभूमी वाचून व्हाल थक्क

नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मुग्धाने सांगितलं, “त्या तिघांना आमच्या नात्याबद्दल व्यवस्थित अंदाज होता. ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चं नुकत्याच झालेल्या पर्वाचं परीक्षण आम्ही ५ जणांनी केलं होतं. तेव्हा सेटवर आमची जेव्हा मजा मस्ती चालायची तेव्हा ते तिघंही आम्हाला चिडवायचे. कार्तिकी तर खूप चिडवायची. त्यामुळे एका पॉइंटनंतर आम्ही तिला नाही म्हणणंही बंद केलं. तुला वाटतंय ना की आमच्यात काहीतरी आहे तर हो, तसं समज असं आम्ही तिला सांगायचो. त्यामुळे शेवटी कंटाळून तिने आम्हाला चिडवणंच बंद केलं.”

हेही वाचा : काय सांगता! स्पृहा जोशी आणि प्रथमेश लघाटे आहेत एकमेकांचे नातेवाईक, जाणून घ्या काय आहे दोघांच्यात नातं?

पुढे प्रथमेश म्हणाला, “तेव्हा कोणालाही आमच्या नात्याबद्दल न सांगण्याचा आमचा उद्देश हाच होता की आपण आधी घरी सांगू आणि मग बाकी सगळ्यांना सांगू. कारण बाहेरून घरी काही कळलं तर ते बरोबर दिसत नाही. दुसरं म्हणजे मुग्धाचं तेव्हा पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू होतं आणि टे झालं कीय आम्ही जाहीर करू असं आमचं ठरलेलं. म्हणून आम्ही आमच्या मित्रमंडळींमध्ये फार कोणाला सांगितलं नव्हतं.” आता मुग्धा आणि प्रथमेशचं हे बोलणं चर्चेत आलं आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mugdha vaishampayan and prathamesh laghate reveals aarya ambekar rohit raut and kartiki gaikwad did not know about their relation rnv