Marathi Actress Mukta Barve : सध्या मराठी मालिकांची घराघरांत तुफान क्रेझ निर्माण झाली आहे. टीआरपीच्या शर्यतीत आघाडीवर राहण्यासाठी वाहिन्यांकडून सतत नवनवीन प्रयत्न केले जात आहेत. याशिवाय लोकप्रिय मराठी कलाकारांनी आपला मोर्चा पुन्हा एकदा टेलिव्हिजनकडे वळवला आहे. गेल्या काही वर्षात स्वप्नील जोशी, श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे, अमृता खानविलकर अशा लोकप्रिय कलाकारांनी मराठी मालिकांमध्ये काम केल्याचं पाहायला मिळालं.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आता लवकरच महाराष्ट्रभूषण अशोक सराफ ‘कलर्स मराठी’च्या ‘अशोक मा.मा.’ या मालिकेत झळकणार आहेत. तर, अभिनेत्री व त्यांच्या पत्नी निवेदिता सराफ ‘स्टार प्रवाह’च्या ‘आई आणि बाबा रिटायर होत आहेत’ यामध्ये प्रमुख भूमिका साकारणार आहेत. या दोघांपाठोपाठ आता आणखी एका अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर एन्ट्री होणार आहे. तिचं नाव आहे मुक्ता बर्वे.

हेही वाचा : आधीचे १० सिनेमे झाले फ्लॉप, ‘या’ एका चित्रपटामुळे माधुरी दीक्षित रातोरात झाली सुपरस्टार! शाहरुखशी आहे खास कनेक्शन

मुक्ता बर्वेने ( Mukta Barve ) आजवर मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ‘अग्निहोत्र’, ‘अजूनही बरसात आहे’, ‘एका लग्नाची दुसरी गोष्ट’, ‘रुद्रम’ अशा एकापेक्षा एक गाजलेल्या मालिकांमध्ये यापूर्वी मुक्ता झळकली आहे. मात्र, मध्यंतरीचा काही काळ मुक्ताने छोट्या पडद्यापासून ब्रेक घेतला होता. यादरम्यान ती चित्रपट व नाटकांमध्ये सक्रियरित्या काम करत होती. आता ही प्रेक्षकांची लाडकी अभिनेत्री ‘कलर्स मराठी’च्या ‘इंद्रायणी’ मालिकेत एन्ट्री घेणार आहे.

मुक्ता बर्वेच्या लूकने वेधलं लक्ष

कपाळावर मोठी टिकली, गळ्यात माळा, साडी, डोळ्याला गॉगल लावून जबरदस्त अंदाजात मुक्ताची मालिकेत एन्ट्री होणार आहे. “आनंदीबाईंच्या वर्चस्वाला आव्हान द्यायला विठुच्या वाडीत आली एक नवी पाहुणी!” असं कॅप्शन देत ‘कलर्स मराठी’ वाहिनीने हा प्रोमो इन्स्टाग्रामवर शेअर करत मालिकेत मुक्ता ( Mukta Barve ) झळकणार असल्याची आनंदाची बातमी प्रेक्षकांना दिली आहे.

हेही वाचा : सैफ अली खानने २१व्या वर्षी केले होते लग्न, आई-वडिलांनाही दिली नव्हती कल्पना; किस्सा सांगत म्हणालेला, “पहिलीच डेट आणि…”

‘इंद्रायणी’ मालिकेत मुक्ताने एन्ट्री घेतल्याचा खास सीन प्रेक्षकांना शनिवारी १६ नोव्हेंबरला सायंकाळी ७ वाजता पाहता येणार आहे. आता आनंदीची जिरवून लहानग्या इंदूची मदत मुक्ता कशी करणार हे मालिकेत पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. दरम्यान, मुक्ताच्या एन्ट्रीचा प्रोमो सध्या सर्वत्र तुफान व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांसह अभिनेत्रीच्या ( Mukta Barve ) चाहत्यांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मुक्ताला नव्या रुपात पाहण्यासाठी तिचे सगळे चाहते आतुर झाले आहेत.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mukta barve entry in colors marathi serial first look and promo out watch now sva 00