‘नवरी मिळे हिटलरला'(Navri Mile Hitlarla) मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत दिसणारी अभिनेत्री म्हणजे वल्लरी विराज होय. वल्लरी तिच्या अभिनयामुळे घराघरांत पोहोचली आहे. तिच्या मालिकेबरोबरच ती तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमुळेदेखील चर्चेत असते. आता अभिनेत्रीने मालिकेच्या शूटिंगदरम्यान एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘असा’ शूट झाला अपघाताचा सीन

वल्लरी विराजने ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेच्या शूटिंगचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ मालिकेतील अपघाताच्या सीनचा आहे. मालिकेत नुकताच रेवती आणि लीला या अपघातात सापडल्याचे पाहायला मिळाले. आता हा अपघाताचा सीन कसा शूट केला गेला हे या व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. त्या जेव्हा खाली पडतात, त्यावेळी रस्त्यावर गादी टाकलेली दिसत आहे. रेवती आणि लीला त्यावर उडी मारतात. मग त्यांच्या हातावर लाल रंगाचे कोणते तरी द्रव्य टाकले जाते, असे यामध्ये पाहायला मिळाले. हा व्हि़डीओ शेअर करताना वल्लरीने, “सत्य घटना पर आधारित”, असे लिहिले आहे.

इन्स्टाग्राम

हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी भन्नाट कमेंट्स केल्याचे पाहायला मिळत आहे. एका नेटकऱ्याने लिहिले, “उत्तम अभिनय.” दुसऱ्या एका नेटकऱ्याने म्हटले, “समोर खड्डा असूनदेखील त्यात उडी मारायची. आपल्या सवयीमुळे लीलाने परत एकदा उडी मारली; पण यावेळी रेवतीला वाचवायला”, असे म्हणत हसण्याच्या इमोजी शेअर केल्या आहेत. “खूप छान”, “संघर्ष” अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी वल्लरीच्या पोस्टवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

हेही वाचा: Kangana Ranaut : “महाराष्ट्रात दैत्यांचा पराभव झाला, महिलेचा अपमान..”, निकालानंतर कंगनाची पहिली प्रतिक्रिया

मालिकेत सध्या यश आणि श्वेताच्या लग्नाची तयारी सुरू आहे; मात्र यश आणि रेवतीचे एकमेकांवर प्रेम आहे. एजेने दोघांना विचारल्यानंतर दुर्गाच्या दबावामुळे ते एकमेकांवर प्रेम असल्याचे कबूल करत नाहीत. मात्र, लीला रेवतीला समजावून एजेकडे घेऊन जात असते आणि त्याच वेळी हा अपघात होतो. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पाहायला मिळत आहे, एजे रेवतीच्या भावना समजून घेतो. दुसरीकडे लीला श्वेता आणि यशच्या साखरपुड्यात वेश बदलून जाते आणि यश तिथून गायब होतो. त्यामुळे आता एजे पुढे काय करणार, लीलाचा नेमका प्लॅन काय हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

आता मालिकेत पुढे काय घडणार, हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असल्याचे पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navri mile hitlarla fame actress vallari viraj shares accident scene of shooting behind the scene video nsp