NiaNia Sharma Buys New Car : दिवाळीचा सण म्हणजे खरेदीचा उत्सवच असतो. त्यातही दसऱ्यानंतर खरेदीचा उत्साह अधिक वाढतो. दिवाळीत अनेक जण नव्या गोष्टींची खरेदी करीत हा सण आनंदानं साजरा करतात. कोणी नवं घर घेतं, कोणी घरातली नवी वस्तू, तर कोणी गाड्यांची खरेदी करतं. दरवर्षी दिवाळीनिमित्त अनेक कलाकार मंडळी नव्या गाड्यांची खरेदी करताना दिसतात. अशातच लोकप्रिय टीव्ही अभिनेत्रीनं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आलिशान कार खरेदी केली आहे.
अभिनेत्री निया शर्मा हिनं दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आलिशान कार खरेदी केली आहे. निया शर्मा ही छोट्या पडद्यावरील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिनं अनेक मालिकांमध्ये सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारची पात्रं अगदी प्रभावीपणे साकारली आहेत. अभिनयाबरोबरच निया सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते आणि आपल्या आयुष्यातील अनेक गोष्टी चाहत्यांबरोबर शेअर करीत असते. अशातच नियानं नव्या गाडीची खास झलक चाहत्यांबरोबर शेअर केली आहे.
नियानं Mercedes AMG CLE 53 ही कार खरेदी केली आहे. अभिनेत्री नुकतीच रवी दुबे आणि अभिनेत्री सरगुन मेहता यांच्या दिवाळी पार्टीत दिसली होती. यावेळी निया तिच्या या नव्या कारमधून पार्टीला पोहोचेली होती. मात्र, ही कार तिची असल्याचं कुणालाही माहीत नव्हतं. नियानं स्वत: या कारबरोबरचे फोटो आपल्या सोशल मीडियावर शेअर करताच सर्वांना तिच्या या नव्या गाडीची बातमी मिळाली आहे.
निया शर्मानं तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर गाडीसह १२ फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती शोरूममध्ये कार घेण्यापासून ते तिच्या गाडीची पूजा करतानाचे क्षण पाहायला मिळत आहेत. यावेळी तिची आई व भाऊदेखील तिच्याबरोबर तिच्या या आनंदात सहभागी झाले होते. या फोटोबरोबर नियानं एक मजेशीर कॅप्शन लिहिली आहे, ‘AMG!! All Money Gone (सगळे पैसे गेले); EMI चालू.’
निया शर्माच्या नव्या गाडीची किंमत किती?
Financial Express च्या वृत्तानुसार, निया शर्मानं घेतलेल्या Mercedes AMG CLE 53 ची किंमत जवळपास १.३५ कोटी रुपये (एक्स-शोरूम) इतकी आहे. नियाची ही पहिली लक्झरी कार आहे, असं नाही. तिच्या कार कलेक्शनमध्ये काळ्या रंगाची Volvo XC90 SUV, एक Audi Q7 व एक Audi A4 यांचा समावेश आहे. तिची लक्झरी लाइफस्टाईल सर्वांनाच माहीत आहे. ती अनेकदा विदेशांत सुट्यांवर जाते, महागडे इंटरनॅशनल ब्रँड्स वापरते. त्याचे अनेक फोटो-व्हिडीओ ती शेअर करताना दिसते.
निया शर्माने शेअर केले नव्या गाडीचे फोटो
दरम्यान, नियानं ही नवीन आलिशान कार खरेदी करताच तिच्यावर अनेक कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. अमृता खानविलकर, अंकिता लोखंडे, नकुल मेहता आणि शंतनू महेश्वरीसह अनेक कलाकार मंडळींनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच नियाच्या अनेक चाहत्यांनीसुद्धा नव्या कारच्या खरेदीबद्दल तिचं कौतुक केलं आहे.