अभिनेत्री प्राजक्ता माळी ‘जुळून येती रेशीमगाठी’ या मालिकेमुळे घराघरांत पोहोचली. चित्रपट, मालिका, वेब सीरिजमध्ये विविध भूमिका साकारत तिने प्रेक्षकांच्या मनावर अभिनयाचा ठसा उमटवला. अभिनयासह तिचा स्वत:चा व्यवसायदेखील आहे. सध्या प्राजक्ता महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमध्ये सूत्रसंचालनाची जबाबदारी सांभाळतेय. प्राजक्ता सोशल मीडियावर सक्रिय असून आपल्या वैयक्तिक आयुष्यातले अनेक किस्से ती चाहत्यांबरोबर शेअर करत असते. अशातच प्राजक्ताची एक पोस्ट सध्या चर्चेत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्राजक्ताने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. प्राजक्ता श्वेता ज्ञानेश्वर माळी अशा नावाचा फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. याला लेटपोस्ट असं हॅशटॅग देतं तिने कॅप्शन दिलं आहे. “नमस्कार मी प्राजक्ता श्वेता माळी, काय झालं, अहो हो हो बरोबर नाव ऐकलं तुम्ही, आता आपल्या नावानंतर आईचं नाव लावणं अनिवार्य आहे , अहो हे मी नाही आपलं सरकार बोलत आहे. आपल्या आयुष्यात वडिलांचं नाव महत्वाचं आहे तितकंच आईचं नाव देखील महत्वाचं आहे, आणि हा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे आपल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला बालविकास मंत्री अदिती वरदा सुनील तटकरे ताई यांनी. आता यापुढे सर्व शासकीय कागदपत्रांवर वडिलांच्या नावाआधी आईचं नाव लावणं गरजेचं आहे. तर आहे ना अभिमानाची गोष्ट….. धन्यवाद.”

प्राजक्ताच्या या पोस्टला नेटकऱ्यांनी कमेंट करत भरभरून प्रतिसाद दिला आहे. एकाने कमेंट करत लिहिलं, “हे म्हणजे आपल्या आईचा आणि आपल्या मातृशक्तीचा सन्मानच आहे”, तर दुसऱ्याने लिहिलं, “देवकी नंदन कृष्ण,कौशल्या पुत्र राम. आपली संस्कृती होती, ती परत आणल्याबद्दल धन्यवाद.”

हेही वाचा… “४ महिन्यांची लेक एकटी…”, २६/११ ला पतीसह ताजमहाल हॉटेलमध्ये अडकलेली सोनाली खरे

दरम्यान, प्राजक्ता माळीच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, शाहरुख खान अभिनीत ‘स्वदेस’ या चित्रपटात प्राजक्ता माळीने एक लहान भूमिका साकारली होती. ‘हंपी’, ‘पावनखिंड’, ‘लकडाऊन बी पॉझिटीव्ह’ या चित्रपटांमध्ये तिने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘तीन अडकून सिताराम’ या चित्रपटात ती शेवटची झळकली होती.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Prajakta mali put her mothers name said its mandatory to put mothers name after your name decision by aditi tatkare dvr