Apurva Nemlekar And Swarda Thigale Dance Video: ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवरील ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील कलाकार नेहमी चर्चेत असतात. या मालिकेतील कलाकार सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. हे कलाकार कायम डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. इंद्रा, कोमल, स्वाती यांचे डान्स सतत व्हायरल होतं असतात. आता मुक्ता आणि सावनीच्या डान्स व्हिडीओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काही दिवसांपूर्वी ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेतील मुक्ताच्या भूमिकेतील अभिनेत्री बदलली. तेजश्री प्रधानने ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला अचानक रामराम केला. त्यामुळे सध्या तिच्या जागी स्वरदा ठिगळे पाहायला मिळत आहे. तेव्हापासून स्वरदा आणि अपूर्वा जोगळेकर सतत पार्टी करताना दिसत आहे. ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत स्वरदाची एन्ट्री झाल्यावर अपूर्वाने सोशल मीडियावर तिच्यासाठी खास पोस्ट लिहिली होती. त्यानंतर आता दोघींचा जबरदस्त डान्स पाहायला मिळाला आहे.

स्वरदा ठिगळेने हा डान्स व्हिडीओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये स्वरदा आणि अपूर्वा जुन्या लोकप्रिय गाण्यावर थिरकताना पाहायला मिळत आहे. दोघींनी सोनू निगमचं ‘तू’ गाण्यावर डान्स केला आहे. मूळ गाण्यामधील हूकस्टेप स्वरदा आणि अपूर्वा करताना दिसत आहेत. दोघींचा हा डान्स व्हिडीओ खूपच चर्चेत आला आहे.

स्वरदा आणि अपूर्वाच्या या डान्स व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘खूप छान’, ‘भारी’, ‘रील लाइफमध्ये शत्रू आणि रिअल लाइफमध्ये चांगल्या मैत्रिणी’, ‘दोन खूप सुंदर मुली’, ‘मस्त’, ‘जबरदस्त’, ‘डान्स खूप छान केलाय’ अशा अनेक प्रतिक्रिया चाहत्यांच्या उमटल्या आहेत.

दरम्यान, तेजश्री प्रधानच्या एक्झिटनंतर ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेवर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. मालिकेचा मोठ्या प्रमाणात टीआरपी घसरला आहे. तसंच १० फेब्रुवारीपासून ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेला प्राइम टाइमवरून हटवलं आहे. आता ही मालिका संध्याकाळी ६.३० वाजता प्रसारित होत आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Premachi goshta fame swarda thigale and apurva nemlekar dance video viral pps