मराठी गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांचा प्रसिद्ध मराठी टॉक शो ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल १० वर्षांनी पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरु होणार आहे. अवधूत गुप्तेच्य ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या पहिल्याच भागात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हजेरी लावणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नुकताच ‘झी मराठी’ने इन्स्टाग्रामवर राज ठाकरेंचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत अवधूत गुप्ते हा राज ठाकरेंना बारसू रिफायनरी प्रकल्पाबद्दल प्रश्न विचारताना दिसत आहे. “मी परवाच उद्धव ठाकरेंना भेटलो, त्यावेळी मला व्यक्तिश: असं फार जाणवलं की तुमचे आणि त्यांचे बारसूबद्दलचे विचार खूप जुळतात. मग एखादं आंदोलन एकत्र करायला काय हरकत आहे”, असे अवधूत गुप्तेने राज ठाकरेंना विचारले.
आणखी वाचा : “महेश मांजरेकरांनी तुमच्यावर चित्रपट का काढला नाही?” राज ठाकरे म्हणाले “माझ्यात…”

त्यावर राज ठाकरे म्हणाले, “या प्रकल्पासाठी जेव्हा बारसूचा विचार झाला तेव्हा बारसूचं पत्र हे त्यांनीच दिलेलं आहे. तुम्ही त्या प्रमुख पदावर आहात, तुम्ही माणसांवर टाकून कसं चालेल. चूक तुमची झाली ना… तिथे कातळशिल्प आहेत, हे त्याच्या अगोदर जगाला माहिती होतं. तिथे काही नवीन दोन महिन्यांपूर्वी ते सापडलेलं नाही. त्यावर असंख्य लोक काम करतात, याचा अर्थ लक्ष नाही.”

“मला सर्वात महत्त्वाची एक गोष्ट वाटते ती म्हणजे तुम्ही एकदा सांगताय नाणार, एकदा सांगताय बारसू…. इतकी हजारो एकर जमीन अचानक ताब्यात कशी आली? ही जमीन अचानक ताब्यात येतेच कशी? कोण आहेत ही माणसं? जे आपल्या कोकणी बांधवांकडून कवडीमोल दरात विकत घेताय आणि त्याच्या हजार पट किंमतीने सरकारला विकताय, हा कोकणात जो धंदा चालू आहे, हा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला माहिती नाही”, असा रोखठोक प्रश्नही त्यांनी उद्धव ठाकरेंना विचारला.

आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

दरम्यान ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. यात राज ठाकरे सहभागी होणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम तब्बल १० वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raj thackeray talk about barsu refinery project in konkan angry on uddhav thackeray see khupte tithe gupte video nrp
First published on: 01-06-2023 at 18:01 IST