Premium

“महेश मांजरेकरांनी तुमच्यावर चित्रपट का काढला नाही?” राज ठाकरे म्हणाले “माझ्यात…”

राज ठाकरेंना तुमच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाबद्दल विचारले असता त्यांनी त्यावर फारच हटके पद्धतीने उत्तर दिले.

mahesh manjrekar raj thackeray
महेश मांजरेकर राज ठाकरे

मराठी गायक आणि संगीतकार अवधूत गुप्ते यांचा प्रसिद्ध मराठी टॉक शो ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तब्बल १० वर्षांनी पुन्हा एकदा हा कार्यक्रम सुरु होणार आहे. अवधूत गुप्तेच्या आगामी ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमात राज ठाकरे हजेरी लावणार आहेत

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमात नुकतंच राज ठाकरेंनी हजेरी लावला. या कार्यक्रमातील काही व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या कार्यक्रमात अवधूत गुप्तेंनी राज ठाकरेंना ट्रोलर्सने विचारलेले काही प्रश्न दाखवले. त्यावेळी राज ठाकरेंना तुमच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाबद्दल विचारले असता त्यांनी त्यावर फारच हटके पद्धतीने उत्तर दिले.
आणखी वाचा : “मी आतापर्यंत दिलेल्या मुलाखतींपैकी…” राज ठाकरेंनी सांगितला ‘खुपते तिथे गुप्ते’ कार्यक्रमाच्या शूटींगचा अनुभव

“राज साहेब तुमच्या पक्षात महेश मांजरेकर, अमेय खोपकर, अभिजीत पानसे असे सिनेमे बनवणारे लोक पक्षात आहेत. पण एकालाही तुमच्यावर सिनेमा का काढावासा वाटला नाही?” असा प्रश्न विचारण्यात आला.

आणखी वाचा : ऋतुराज गायकवाडने होणाऱ्या पत्नीबरोबरचा पहिला फोटो केला शेअर, सायली संजीव म्हणाली…

यावर राज ठाकरेंनी “माझ्यात तसं मटेरिअल नसेल”, असे मजेशीर उत्तर दिले.त्यावर अवधूत गुप्तेने “साहेब तुमचं आयुष्य आपकी जिंदगी इतनी लंबी नही इतकी बडी भी है, तुम्ही वेबसीरिजच सुरु करा. त्याचे अनेक सिझन होतील”, असे म्हटले.

दरम्यान ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. यात राज ठाकरे सहभागी होणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम तब्बल १० वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Raj thackeray talk about why mahesh manjrekar amey khopkar abhijeet panse did not make a film on me said nrp