आयपीएलच्या १६ व्या हंगामात चेन्नई सुपर किंग्जने विजेतेपदावर नाव कोरंल. चेन्नईला शेवटच्या षटकात दोन चेंडूंवर १० धावांची आवश्यकता असताना चेन्नईचा स्टार फलंदाज रविंद्र जडेजाने चौकार आणि षटकार ठोकला. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्ज आयपीएल २०२३ चा किताब जिंकण्यात यशस्वी ठरली. रविंद्र जडेजाच्या धडाकेबाज फलंदाजीचं सर्वत्र कौतुक होत असतानाच दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाडने त्याच्या होणाऱ्या पत्नीबरोबरचा खास फोटो पोस्ट केला आहे. त्यावर आता अभिनेत्री सायली संजीवने कमेंट केली आहे.

चेन्नई सुपर किंग्सचा स्टार आणि टीम इंडियाचा फलंदाज ऋतुराज गायकवाड चेन्नई सुपर किंग्जच्या विजयानंतर इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली होती. यात त्याने भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार असलेल्या महेंद्रसिंग धोनीबरोबरचा एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत एका बाजूला ऋतुराज, मध्ये धोनी आणि बाजूला त्याची होणारी पत्नी उत्कर्षा बसली आहे.
आणखी वाचा : एका बाजूला धोनी, तर दुसऱ्या बाजूला उत्कर्षा; ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचा पहिला फोटो समोर, म्हणाला…

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

“माझ्या आयुष्यातील दोन व्हीव्हीआयपी. यासाठी मी देवाचा खरंच आभारी आहे”, असे कॅप्शन ऋतुराजने या फोटोला दिले आहे. ऋतुराजची ही पोस्ट सध्या चांगलीच व्हायरल होत आहे. त्याच्या या पोस्टवर मराठमोळी अभिनेत्री सायली संजीवने कमेंट केली आहे.

सायली संजीवने ऋतुराजला आणि उत्कर्षाला शुभेच्छा दिल्या आहेत. “तुम्हा दोघांना मनापासून शुभेच्छा”, अशी कमेंट सायली संजीवने केली आहे. त्याबरोबरच तिने उत्कर्षा आणि ऋतुराज या दोघांनाही टॅग केले आहे. ऋतुराजने पहिल्यांदाच उत्कर्षाबरोबर जाहीरपणे फोटो पोस्ट केला आहे. ते दोघेही जूनच्या पहिल्या आठवड्यात लग्नबंधनात अडकणार असल्याचे बोललं जात आहे. मात्र अद्याप याबद्दल ऋतुराजने अधिकृत माहिती दिलेली नाही.

आणखी वाचा : Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाडच्या होणाऱ्या पत्नीचे नाव आले समोर, जाणून घ्या तिच्याबद्दल…

sayali sanjeev comment

सायली संजीव

आणखी वाचा : Ruturaj Gaikwad Marriage : ऋतुराज गायकवाड लवकरच अडकणार विवाहबंधनात? तारीख आली समोर

दरम्यान ऋतुराजने हा फोटो पोस्ट केल्यावर अनेक क्रिकेटपटूंसह त्याच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अनेकांनी ऋतुराजला त्याच्या लग्नापूर्वीच त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

Story img Loader