मराठी गायक, संगीतकार अवधूत गुप्तेचा प्रसिद्ध टॉक शो ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या पर्वाच्या पहिल्या भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी हजेरी लावली. या भागाचे शूटींग झाल्यानंतर राज ठाकरेंनी त्यांचा अनुभव सांगितला.

राज ठाकरेंनी नुकतंच प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी त्यांनी अवधूत गुप्तेंबरोबर ही मुलाखत देताना मला फार आनंद झाला, असे राज ठाकरे म्हणाले.
आणखी वाचा : प्रसिद्ध के-पॉप गायिकेची आत्महत्या, हॉटेलच्या खोलीत आढळला मृतदेह, सुसाईड नोट सापडली

lokrang article, Maharshi Vitthal Ramji Shinde, maharshi shinde centenary golden jubilee year, prarthana samaj, centenary golden jubilee year, bramho samaj, depressed classes mission society, Asprushata Niwaran Parishad, Bhartiya Asprushyatecha Prashna, work for depressed class, maharshi vitthal ramji shinde, 23 april 2024, reformer,
निमित्त : समर्पित समाजसुधारक
sanjay ruat and shrikant shinde
श्रीकांत शिंदे फाऊंडेशनमध्ये गैरव्यवहार? संजय राऊतांची थेट मोदींकडे तक्रार; म्हणाले, “बिदागीच्या रकमा…”
kolhapur lok sabha seat, sanjay mandlik, sanjay mandlik controversial statement, shahu maharaj, historians criticise sanjay mandlik, shivsena, bjp, congress, lok sabha 2024, election 2024, mahayuti, maha vikas aghadi, kolhapur politics, kolhapur shahu maharaj, controversial statment on shahu maharaj,
छत्रपतींच्या गादीचा मंडलिकांकडून अवमान; इतिहास संशोधकांनी व्यक्त केला निषेध
thane lok sabha seat, BJP s Sanjeev Naik, Launches Campaign in Thane, Emphasizes Charitable Birthday Celebration, sanjeev naik in thane lok sabha, mahayuti, shinde shivsena,
वाढदिवसाच्या निमित्ताने संजीव नाईक यांची मतपेरणी

मी नुकतंच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाच्या पहिल्या भागाचे शूटींग केले. “मी आतापर्यंत दिलेल्या अनेक मुलाखतींपैकी ही सर्वात अनोखी मुलाखत आहे, असे मला वाटते”, असे राज ठाकरेंनी म्हटले.

यावेळी राज ठाकरेंना तुम्ही या आधी ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम पाहिला होता का? असे विचारण्यात आले. त्यावर ते म्हणाले, “हो, मी हा कार्यक्रम १०-१२ वर्षांपूर्वी प्रदर्शित व्हायचा तेव्हा पाहिला आहे. त्यावेळी या कार्यक्रमात गोपीनाथ मुंडे आणि इतर राजकीय मंडळी सहभागी झाली होती. मला त्यावेळी तो कार्यक्रम पाहायला आवडायचा.”

आणखी वाचा : “प्रेमाने जखम दिली तर…” उर्मिला कोठारेने दिलेलं थेट उत्तर 

लवकरच ‘खुपते तिथे गुप्ते’ या कार्यक्रमाचा पहिला भाग प्रदर्शित होणार आहे. यात राज ठाकरे सहभागी होणार आहेत. ‘खुपते तिथे गुप्ते’ हा कार्यक्रम तब्बल १० वर्षांनी पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. येत्या ४ जूनपासून दर रविवारी रात्री ९ वाजता हा कार्यक्रम पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.