‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय कार्यक्रम आहे. गेली १४ वर्ष तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत त्यांना हसवत आहे. या मालिकेतील प्रत्येक कलाकारावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात. मालिकेतील कलाकारांना या मालिकेतील त्यांच्या भूमिकांमुळे नवी ओळख मिळाली. या मालिकेतील दिलीप जोशी सकारात असलेलं जेठालाल हे पात्र गेली अनेक वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. परंतु या पात्रासाठी दिलीप जोशी ही निर्माते-दिग्दर्शकांची पहिली पसंती नव्हती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

या मालिकेतील जेठालाल हे पात्र अभिनेते दिलीप जोशी साकारत आहेत. त्यांच्या उत्स्फूर्ततेने आणि त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने ते साकारत असलेल्या या पात्राला प्रेक्षकांकडून पहिल्या दिवसापासूनच तुफान प्रतिसाद मिळत आहे. परंतु दिलीप जोशींच्या आधी मनोरंजन सृष्टीतील एका आघाडीच्या अभिनेत्याला या भूमिकेसाठी विचारणा करण्यात आली होती. ते अभिनेते म्हणजे राजपाल यादव.

आणखी वाचा : ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेतील ‘भिडे’ एका एपिसोडसाठी आकारतात ‘इतके’ मानधन, आकडा ऐकून व्हाल थक्क

राजपाल यादव ही जेठालालच्या भूमिकेसाठी निर्मात्यांची पहिली पसंती होती. निर्मात्यांनी त्यांना या भूमिकेसाठी विचारणाही केली होती. परंतु त्यांची बोलणी पुढे गेली नाहीत. तेव्हा राजपाल यादव यांना असेच रोल करायचे होते जे त्यांना विचारात घेऊन लिहिले गेले असतील. राजपाल यादव यांनी भूमिका करण्यासाठी नकार दिल्यानंतर निर्मात्यांनी दिलीप जोशी यांना या भूमिकेसाठी विचारलं आणि त्यांनी होकार दिला.

हेही वाचा : Video: अनवाणी होऊन आलिया भट्टने केलेली ‘ती’ कृती चर्चेत, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

दरम्यान मध्यंतरी एका मुलाखतीमध्ये राजपाल यादव यांना “जेठालालची भूमिका नाकारल्याचा आता पश्चाताप होतो का?” असा प्रश्न विचारला असता “मला ही भूमिका नाकारल्याबद्दल कुठलंही दुःख वाटत नाही,” आहे ते म्हणाले होते. जर राजपाल यादव यांनी या भूमिकेसाठी होकार दिला असता तर आज जेठालालच्या भूमिकेत आपल्याला राजपाल यादव भेटायला आले असते.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajpal yadav was the first preference of makers of taarak mehta ka ooltah chashmah rnv