scorecardresearch

Video: अनवाणी होऊन आलिया भट्टने केलेली ‘ती’ कृती चर्चेत, व्हिडीओ पाहून नेटकरी थक्क

तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे.

alia bhatt

बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये आलिया भट्टचं नाव नेहमीच वरच्या स्थानी सामील असतं. कधी तिच्या कामामुळे, कधी तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे, तर कधी तिच्या वागणुकीमुळे ती नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते. आता तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आला आहे.

साऊथचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘RRR’ मधील ‘नाटू नाटू’ हे गाणे भारतासह जगभरात प्रसिद्ध आहे. या गाण्याने आत्तापर्यंत अनेक पुरस्कार पटकावले असले तरी गोल्डन ग्लोब अवॉर्ड्स २०२३ मध्ये ‘नाटू नाटू’ला सर्वोत्कृष्ट मूळ गाण्याचा किताब मिळाला आहे. नाटू नाटूवर नाचण्यापासून या चित्रपटाच्या चाहत्यांबरोबरच सेलिब्रिटी देखील स्वतःला रोखू शकत नाहीत. तर आता आलिया भट्टने त्या गाण्यावर चक्क अनवाणी नाद केला आहे.

आणखी वाचा : लेकीच्या जन्मानंतर ३ महिन्यांतच आलिया भट्टचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन, बदललेलं रूप पाहून तुम्हीही व्हाल आश्चर्यचकित

आलिया भट्टचा एक व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये आलिया साडी नेसून नाटू नाटू या गाण्यावर अनवाणी डान्स करताना दिसत आहे. यादरम्यान आलियाची एनर्जी पाहण्यासारखी आहे. त्यामुळेच अभिनेत्रीची ही स्टाईल पाहून चाहते तिचं खूपच कौतुक करत आहेत.

हेही वाचा : “माझी सून फारच…” आलिया भट्टबद्दल स्पष्टच बोलल्या नीतू कपूर

या व्हायरल व्हिडीओ वर कमेंट करत एका नेटकऱ्याने लिहिलं, “याला म्हणतात पॉवरपॅक परफॉर्मन्स.” तर दुसरा नेटकरी म्हणाला, “कोण म्हणेल चार महिन्यांपूर्वी हिने एका बाळाला जन्म दिला आहे म्हणून!” आता आलिया या व्हिडीओमुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड ( Bollywood ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-02-2023 at 14:37 IST
ताज्या बातम्या