"मी नमाज पठण करत असताना आदिलने लाथेने...”, राखी सावंतने सांगितला 'तो' प्रसंग| rakhi sawant allegations on adil khan said he beat me | Loksatta

“मी नमाज पठण करत असताना आदिलने लाथेने…”, राखी सावंतने सांगितला ‘तो’ प्रसंग

राखी सावंतचे पती आदिल खानवर धक्कादायक आरोप

rakhi sawant alleged adil khan (3)
राखी सावंतने सांगितला तो प्रसंग. (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

मॉडेल व अभिनेत्री राखी सावंत पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. राखीच्या संसारात वादळ आलं आहे. राखीने मीडियासमोर येत आदिलचं दुसऱ्या मुलीबरोबर अफेअर असल्याचा खुलासा केला आहे. त्याच्या गर्लफ्रेंडचं नावही जाहीर करत राखीने आदिलवर गंभीर आरोप केले आहेत.

राखीचा एक नवीन व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये राखीने आदिलबाबत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. राखीने एका भयानक प्रसंगाबाबतही या व्हिडीओमध्ये भाष्य केलं आहे. “आदिलने मला लाथेने मारलं आहे. मी एक दिवस नमाज पठण करत होते. तेव्हा त्याच्या गर्लफ्रेंडचा फोन आला. नमाज पठण करत असतानाच त्याने मला मारलं”, असं राखी म्हणाली आहे. याशिवाय राखीने आदिलवर पैसे व दागिने घेऊन गेल्याचा आरोपही केला आहे.

हेही वाचा>> “माझ्या आईचं निधन झालं, तेव्हा आदिल गर्लफ्रेंडबरोबर…”, राखी सावंतचा खळबळजनक खुलासा

हेही वाचा>> ७५ महिलांना अंगद बेदीने केलंय डेट; नोरा फतेहीबरोबर होतं अफेअर, पण नेहा धुपिया गरोदर राहिली अन्…

राखीच्या आईचं काही दिवसांपूर्वीच निधन झालं आहे. राखीने तिच्या आईच्या निधनासाठी आदिल खानला जबाबदार ठरवलं आहे. “माझी आई आदिल खानमुळे गेली. आदिलने तिच्या उपचारासाठी पैसे दिले नाहीत. तिच्यावर वेळीच उपचार झाले असते, तर माझी आई कदाचित आज जिवंत असती”, असं राखी म्हणाली आहे.

हेही पाहा>> “माझे सर्व पैसे आदिल खानने घेतले”, राखी सावंतचे पतीवर धक्कादायक आरोप; म्हणाली “माझा शारीरिक अन्…”

राखी सावंत व आदिलने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. त्यानंतर त्यांनी निकाकही केला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच राखीने तिच्या लग्नाबाबत खुलासा केला होता. अनेक दिवस ड्रामा केल्यानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं.

मराठीतील सर्व टेलीव्हिजन ( Television ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-02-2023 at 20:28 IST
Next Story
“माझ्या आईचं निधन झालं, तेव्हा आदिल गर्लफ्रेंडबरोबर…”, राखी सावंतचा खळबळजनक खुलासा